सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) स्टारर दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांच्या राधे श्याम (Radhe Shyam) या चित्रपटाची दिवसभर दाक्षिणात्य सिनेमाघरात चर्चा होती. या चित्रपटाच्या व्यवसायाच्या आकडेवारीवर दिवसभर प्रेक्षकांमधून चर्चा होताना दिसल्या. तसेच, चित्रपटाच्या दिग्दर्शकाने एका ट्विटद्वारे खराब रिव्यूजला सडेतोड उत्तर दिले आहे. त्याचवेळी अभिनेत्री काजल अग्रवालचे मॅटर्निटी फोटोशूटही दिवसभर चर्चेत राहिले. आज आपण पाहणार आहोत दिवसभर व्हायरल झालेल्या साउथ सिनेमाच्या 5 मोठ्या बातम्या.(Top 5 South Gossips of the Day)
साऊथ सुपरस्टार प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या राधे श्याम या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी बंपर कमाई करत आपल्या खात्यात 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाने अवघ्या 2 दिवसांत 119 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ही रक्कम जमा केली आहे. मात्र, हिंदी बॉक्स ऑफिसमध्ये हा चित्रपट केवळ 9 कोटींची कमाई करू शकला आहे.
टॉलीवूड सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांचा आरआरआर चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच आरआरआरशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या चित्रपटातील 2 महत्त्वाची दृश्ये ऑनलाईन लीक झाली आहेत. त्यानंतर निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. हे सीन राम चरण आणि ज्युनियर एनटीआरचे एन्ट्री सीन होते जे चित्रपटाचे मुख्य आकर्षण होते असे सांगितले जात आहे.
अभिनेत्री काजल अग्रवालने आज तिच्या मॅटर्निटी फोटोशूटने लोकांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेत्रीने एक अतिशय गोंडस ब्लॅक अँड व्हाइट फोटोशूट चाहत्यांमध्ये शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री, तिचा पाळीव कुत्रा आणि पती गौतम किचलूसोबत बेबी बंप दाखवताना दिसली होती.
राधे श्याम चित्रपट बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करण्यात व्यस्त आहे. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही लोकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. त्याचवेळी काही लोकांना हा चित्रपट फारसा आवडला नाही. त्यानंतर या चित्रपटाला वाईट रिव्ह्यूही मिळाले. आता दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांनी या वाईट रिव्ह्यूवर मौन सोडत सोशल मीडियावर लिहिलं की रिव्ह्यू नाही तर रिझल्ट महत्त्वाचा असतो.
चित्रपट स्टार प्रभास सध्या भारतात नसल्याची चर्चा आहे.एका वृतसंस्थेच्या खास रिपोर्टनुसार, सुपरस्टार प्रभास राधे श्यामच्या रिलीजच्या एक दिवस आधी इटलीला रवाना झाला. हा फिल्मस्टार आपल्या मित्रांसोबत सुट्टी घालवण्यासाठी येथे गेल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या-
१७ वर्षांत ३९९ काश्मिरी पंडित मारले पण १५००० मुस्लिम देखील मारले गेले, काँग्रेसच्या वादग्रस्त ट्विटनंतर लोक भडकले
हे कारण देत हिजाबवरील बंदी हायकोर्टाने कायम ठेवली; कोर्ट म्हणाले
फडणवीसांचा आणखी एक पेनड्राईव्ह बॉम्ब, वक्फ बोर्डावर दाऊदची माणसं, राजकारणात खळबळ
पुण्यात खळबळ! शिक्षकांसमोर वर्गात घुसून 10 वीच्या विद्यार्थिनीवर केले चाकूनं सपासप वार; आरोपी पसार