Share

‘उद्या उठसूट कोणीही वेगळे होऊन म्हणेल आम्ही पक्ष आहोत, हे लोकशाहीसाठी घातक’; सरन्यायाधीशांची शिंदे गटाला चपराक

बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या शिवसेनेच्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी शिंदे गटासंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिंदे गटाला चांगलीच चपराक बसल्याचं बोललं जात आहे.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा सुनावणी दरम्यान म्हणाले, उद्या उठसूट कोणताही पक्ष अथवा आमदार म्हणतील की आम्ही वेगळे गेलो आणि दोन तृतीयांश आहेत, म्हणजेच आम्हीच पक्ष आहोत. हे लोकशाहीसाठी घातक आहे. सरन्यायाधीशांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांनी हे प्रकरण मोठ्या घटनापीठापुढे द्यायचे की एक ते दोन दिवासांच्या सुनावणीत निर्णय घ्यायचा, हे सोमवारी ठरविण्यात येईल, असे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी सांगितल्याचे म्हटले.

तसेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीती वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु संघवी आणि कपिल सिब्बल या दोघांचं हेच म्हणणं होतं की आम्हाला युक्तीवादासाठी दोनच तास पाहिजे आहेत आणि तुम्ही हे करू शकतात. पण, यात पेच असा आहे की सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत.

केंद्रीय कायमंत्र्यांनी कालच म्हणजेच ३ ऑगस्टला मुख्य न्यायाधीश रमण्णा यांना पत्र पाठवून तुमचा उतराधिकारी नेमण्यात यावा, अशी सूचना केली आहे. त्यानुसार रमण्णा यांनी आपला उत्तराधिकारी नेमला असून सेवा ज्येष्ठतेनुसार ललित यांना सरन्यायाधीश म्हणून नेमण्यात आले आहे.

तसेच म्हणाले, एक संकेत असा असतो, जेव्हा तुम्ही तुमचा उत्तराधिकारी नेमता, तेव्हा मुख्य निर्णय घेतले जात नाहीत, त्यामुळे या प्रकारणासाठी विस्तारीत घटनापीठ नेमण्याची वेळ आली तर त्यामध्ये रमण्णा नसतील, कारण, हे प्रकरण घटनापीठाकडे गेले तर ते विस्तारित घटनापीठ हे पाच न्यायमूर्तीचं असतं.

या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे सुनावणीस जाण्यासाठी काही महिने तरी लागतील. ते प्रकरण डिटेल जाऊ शकते, त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीसाठी काही महिने लागणार असतील, तर त्यात न्यायमूर्ती रमण्णा नसतील, हे स्पष्ट आहे असे वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now