Share

मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्विटने विरोधकांना फोडला घाम; वाचा काय आहे खळबळ उडवणार ट्विट

sanjay raut

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेचे अजूनही राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सभा घेणार असल्याची माहिती दिली होती.  त्यानुसार आज सायंकाळी एमएमआरडीए मैदान, बीकेसी, वांद्रे पूर्व येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे.

सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरची अशा प्रकारची ही पहिलीच राजकीय सभा असणार आहे. या सभेविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष आहे.

याचबरोबर ‘सध्या वैचारिक प्रदूषण बरेच वाढले आहे. यामुळे शनिवारच्या सभेत मी मनातील बोलणार आहे’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. बोलल्याप्रमाणे मीकहयमंत्री आजच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जाहीर सभेत भाजप आणि मनसेचा प्रामुख्याने समाचार घेतील असं बोललं जातं आहे.

तर दुसरीकडे सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे. “आजची सभा ही क्रांतीकारी सभा असेल, आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप अशी ही आजची सभा असणार आहे. या सभेतून सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील.” असं त्यांनी सांगितलं आहे.

ते याबाबत मुंबईत माध्यमांशी बोलत होते. राऊत म्हणाले, “ही आजची सभा आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप आहे. मुंबईत करोना काळानंतर इतक्या मोठ्या सभा झालेल्या नाहीत. शिवसेनेच्या मुंबईतील सभांची परंपरा विराट, अतिवराट अशी आहे, असं खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/1525328115177730048?s=20&t=8zg5xd08-j3F2NcE9Fw8_w

दरम्यान, सभेपूर्वी राऊत यांनी केलेलं सूचक ट्विट देखील तुफान व्हायरल झालं आहे. राऊत यांनी आपल्या खास शैलीत ट्विट करत अप्रत्यक्ष रित्या विरोधकांना टोला लगावला आहे. ट्विटमध्ये राऊत म्हणतात, ‘लगता है फिरसे उतरना पडेगा मैदान में दुबारा: कूछ लोग भूल गये है..अंदाज हमारा!!!जय महाराष्ट्र! आज क्रांतिकारी दिवस!!’

महत्त्वाच्या बातम्या
IPL २०२२ नंतर ‘हे’ २ नवोदीत गोलंदाज थेट भारतीय संघात स्थान मिळवतील; रवी शास्त्रींनी थेटच सांगीतलं
बदला घेतलाच! कश्मिरी पंडीत राहूल भटची हत्या करणाऱ्या अतिरेक्यांचा इंडीयन आर्मीने केला खात्मा
मुंबईत एके ४७ ने गॅंगवार, तिहार जेलची हवा, दाऊदशी संबंध…; ब्रिजभुषणची खतरनाक कुंडली
“हरामखोर, मनोरुग्ण तुला चपलेने 100 मारून 1 मोजले पाहीजे, लवकरच तुला चोप मिळणार”

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now