मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्यातील राजकारणातील महत्त्वाचे आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. अनेकदा त्यांनी घेतल्या स्पष्ट भूमिका या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देतात. तर आता राज हे भोंग्यावरुन चांगलेच आक्रमक झाले आहे. यामुळे सध्या आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत.
तर दुसरीकडे एक आनंदाची बातमी म्हणजे काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे हे आजोबा झाले आहे. यामुळे सध्या ठाकरे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. राज यांचे पुत्र मनसे नेते अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरेंना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. राज यांना नातू झाल्यापासून सोशल मिडियावर बाळाच्या नावाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
अखेर आज राज ठाकरेंच्या नातवाचे नाव समोर येणार आहे. आज राज ठाकरेंच्या नवीन निवासस्थानी म्हणजेच ‘शिवतीर्थावर’ नामकरण विधी पार पडणार आहे. मिळालेल्या माहिती नुसार, या कार्यक्रमासाठी मोजक्याच नातेवाईकांना कळवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
यामुळे आता नेमकं कोणकोण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांच्या नातवाचे फोटो सोशल मिडियावर वाऱ्यागत व्हायरल झाले होते. अमित ठाकरे यांनी बाळासोबतच एक फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता.
दरम्यान, गेल्या 2019 मध्ये धुमधडाक्यात अमित ठाकरे आणि मिताली बोरुडचा विवाहसोहळा संपन्न झाला होता. या विवाहसोहळ्याला मोठ मोठ्या राजकिय नेत्यांनी तसेच प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे विवाहसोहळ्यात बॉलिवूड कलाकारही आले होते.
आता या दोघांच्या लग्नाची तीन वर्षे उलटून गेल्यानंतर अमित-मितालीला पूत्ररत्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या आनंदाने सर्व सीमारेषा पार केल्या आहेत. खास करुन राज ठाकरेंवर पडलेल्या आजोबाच्या जबाबदारीचा त्यांनी हसहसत स्विकार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र आंड्या-पांड्यांचा नाही, लेच्यापेच्यांचा नाही, महाराष्ट्र शिवसेनेचा आहे; सेनेच्या वाघाने फोडली डळकाळी
सलमान खानने लग्न का केले नाही? प्रत्येक वेळी ब्रेकअप का होतात? वडील सलीम खान यांनी सांगितले खरे कारण
कारमध्ये असताना मुस्लिम परिवाराने जिंकले अनुपम खेर यांचे हृद, व्हिडीओ होतोय व्हायरल
तरुणाने थेट IAS अधिकाऱ्याच्या मुलीलाच पटवलं अन्…; लव्ह जिहादचे भयानक प्रकरण आले समोर