वर्धा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात एक, दोन नव्हे तर तब्बल सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार विजय राहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले याचा देखील समावेश होता. मुलाच्या निधनानंतर आमदार विजय राहांगडाले यांनी फेसबुकवर मुलाच्या आठवणीत फेसबुक पोस्ट केली आहे.
भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले याच्यासह सहा वैद्यकीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. कार पुलावरुन खाली कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय विद्यार्थी रात्रीचे जेवण करुन वर्ध्याला जात होते. पुलावरुन कार जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार पुला खाली कोसळली.
ही घटना मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास घडली होती. यामध्ये आविष्कार रहांगडाले यांच्यासह नीरज चव्हाण, शुभम जयस्वाल,प्रत्युशसिंग हरेंद्रसिंग ,नितेश सिंग, विवेक नंदन,पवनशक्ती यांचा देखील भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.
आमदार विजय रहांगडाले आपला मुलगा आविष्कार रहांगडाले याच्या आठवणीत कविता पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी मुलगा अपघातात गेल्याने त्याच्या आईला झालेले दुःख वर्णन केले. तसेच त्याला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न देखील कसे तुटले याबद्दल वर्णन केले आहे. शेवटी त्यांनी तू का रे गेलास परत ये आविष्कार अशी भावनिक गळ कवितेमधून घातली आहे.
https://www.facebook.com/950020351718345/posts/4719995178054158/?flite=scwspnss
कवितेचे शब्दांकन करणारे राकेश साठवणे म्हणतात, आमदार विजय रहांगडाले यांच्यासोबत माझे जवळचे सबंध आहेत. ते नागपूरला आले की नेहमी भेटतात. हक्कानं माझ्या घरी येतात. आविष्कारला फोटोग्राफीची आवड होती. हे धडे तो माझ्याकडून घ्यायचा.
तसेच म्हणाले की, आज कविता लिहीत असताना सतत आविष्कारचा चेहरा डोळ्यांसमोर येत होता. एक एक शब्द मांडत होतो तसे रडायला येत होते. अशा भावना कवितेचे शब्दांकन करणारे राकेश साठवणे यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले होते. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची भरपाई जाहीर केली होती.