बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने जगभरातील लोकांची मने जिंकली आहेत. त्यामुळेच चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून गंगूबाई काठियावाडीने करोडोंच्या घरात कमाई केली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील एका अभिनेत्याने हा चित्रपट पाहण्यासाठी थेट संपूर्ण सिनेमागृहच बुक केल्याची बातमी समोर आली आहे.
पाकिस्तानचा अभिनेता मुनीब बटनने त्याच्या पत्नीला सरप्राईज देण्यासाठी दुबईमधील एक सिनेमागृह बुक केले होते. यावेळी मुनीबची पत्नी आयमान खानला आलिया भट्ट आवडत असल्यामुळे त्याने गंगूबाई काठियावाडी चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण सिनेमागृहच बुक करण्याचे ठरविले. या गोष्टींचा आनंद सर्वांत जास्त पत्नी आयमान खानला झाला.
मुनीबचे हे सरप्राईज पाहून आयमान थक्कच झाली. या दोघांनी या चित्रपटाचा एकत्रितपणे आनंद लुटला. दरम्यान मुनीबने त्याच्या पत्नीला दिलेल्या सरप्राईची चर्चा संपूर्ण जगभरात रंगली आहे. मुनीबने आपल्या पत्नीला गंगुबाई काठियावाडी चित्रपट दाखवल्यामुळे या चित्रपटाची माहिती दुबईमधील नागरिकांना ही झाली आहे.
यामुळे आता गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाच्या कमाईत आणखीन वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाला संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केले आहे. या चित्रपटात आलिया भट, अजय देवगणस, विजय राज, सीमा पाहवा प्रमुख भूमिकेत आहेत. परंतु प्रेक्षकांना सर्वांत जास्त आलिया भटचीच भूमिका भावली आहे.
मुख्य म्हणजे या चित्रपटाच्या यशानंतर लवकरच आलिया भट्ट आरआरआर या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २५ मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात आलिया साऊथ सुपरस्टार रामचरण आणि एनटीआरसोबत प्रमुख भूमिकेत आहे. लवकरच आलियाचे ब्रह्मास्त्र, डार्लिंग, रोकी और राणी की प्रेम कहानी आणि तख्त चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत.
सध्या आलिया याच चित्रपटांच्या शुटींगमध्ये व्यस्त असलेली दिसून येत आहे. दुसरीकडे गंगूबाई काठियावाडी चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस उलटून गेले असले तरी बॉक्स ऑफिसवर चित्रपट धूमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाने आणि चित्रपटातील कलाकारांनी सर्वांचीच मने जिंकली आहेत.
महत्वाच्या बातम्या
या चित्रात तुम्ही पहिल्यांदा काय पाहिले? त्यावरूनच कळेल तुमचे व्यक्तीमत्व कसे आहे? क्लिक करा आणि जाणून घ्या…
‘आमदारांना देण्यात येणारी घरे मोफत देणार नाही तर..,’ गदारोळ झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण
ज्याला भुताटकी म्हणायचे, तोच बंगला विकत घेऊन राजेश खन्नाचे चमकले नशीब; दिले अनेक हिट चित्रपट
भारताची साथ सोडणं पडलं महागात, चीनच्या सापळ्यात अडकून श्रीलंकेची झाली वाईट अवस्था