Share

तो ज्या प्रकारचा माणूस आणि क्रिकेटर आहे त्याबद्दल मला.., धोनीसोबतच्या वादावर गंभीरचे मोठे वक्तव्य

महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीर(Gautam Gambhir) दीर्घकाळ एकमेकांसोबत क्रिकेट खेळले आहेत. एकाने संघाचा कर्णधार म्हणून बराच काळ व्यतीत केला आहे आणि दुसऱ्याने संघाचा उपकर्णधार म्हणून भरपूर क्रिकेट खेळले आहे. या दोन क्रिकेटपटूंनी मिळून टीम इंडियाला अनेक ट्रॉफी मिळवून दिल्या आहेत. यामध्ये 2007 टी 20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक यांचा समावेश आहे.(to-me-the-kind-of-man-and-cricketer-he-is-serious-statement-on-the-controversy-with-dhoni)

इतकं सगळं असूनही या दोन दिग्गजांमध्ये फारच कमी जवळीक निर्माण झाल्याचे नेहमीच दिसून आले आहे. गंभीर फॉर्ममध्ये असूनही, संघात निवड न होणे आणि त्यानंतर धोनीच्या विरोधात जाणारी गंभीरची काही विधाने, या गोष्टींमुळे क्रिकेटविश्वात या दोघांमधील मतभेदांची चर्चा रंगली आहे. अशा गोष्टींवर आता गौतम गंभीरनेच उत्तर दिले आहे.

अँकर जतिन सप्रू(Jatin Sapru)सोबतच्या त्याच्या यूट्यूब शोमध्ये गौतम गंभीर म्हणाला, ‘हा सर्व मूर्खपणा आहे. मला त्याच्याबद्दल खूप आदर आहे आणि नेहमीच असेल. हे मी ऑन रेकॉर्ड सांगितले आहे. मी तुमच्या चॅनलवर हे सांगेन, मी 138 कोटी लोकांसमोर हे कुठेही सांगू शकतो की जेव्हाही त्याला (धोनी) गरज पडेल, आशा आहे की कधीच लागणार नाही, पण आयुष्यात कधीही गरज पडली तर मी पहिला माणूस आहे.

जो त्याच्या पाठीशी उभा राहील कारण त्याने भारतीय क्रिकेटसाठी खूप काही केले आहे. गौतम गंभीर म्हणतो, ‘आमच्यात मतभेद असू शकतात. तुम्हाला हा खेळ वेगळ्या पद्धतीने दिसेल. मी खेळाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहीन. माझा दृष्टिकोन होता, त्याचा दृष्टिकोन होता. जोपर्यंत तो कर्णधार होता, तोपर्यंत मीही त्याच्यासोबत बराच काळ उपकर्णधार होतो.

आयपीएल(IPL)मध्ये आम्ही आपापल्या संघांसोबत खेळलो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धीही होतो. पण तो ज्या प्रकारचा माणूस आहे आणि तो ज्या प्रकारचा क्रिकेटर आहे त्याबद्दल मला खूप आदर आहे. विशेष म्हणजे अनेकदा गौतम गंभीरची विधाने धोनीच्या विरोधात जाताना दिसली आहेत.

कर्णधार आणि फलंदाज म्हणून धोनीवर त्याने टीका केली आहे. 2011 च्या विश्वचषक विजयाचे संपूर्ण श्रेय धोनीला देण्यात आले तेव्हा त्याने सोशल मीडियावर स्पष्टपणे लिहिले होते की हा विजय केवळ धोनीच्या षटकारांमुळे नाही तर संपूर्ण संघाच्या मेहनतीमुळे मिळाला आहे.

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now