बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी मागील अनेक दशकांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. अशीच एक अभिनेत्री जी मागील अनेक वर्षांपासून आपल्या अदाकारीने चाहत्यांना वेड लावत आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आहे. जी वाढत्या वयासोबत अधिकच सुंदर होत चालली आहे. माधुरी दीक्षितने आपल्या अभिनयाने अनेक काळ बॉलिवूडवर राज्य केले आहे. आज ही लोक तिची एक झलक पाहण्यासाठी बेचैन होत असतात.(to-look-beautiful-and-young-madhuri-eats-special-kind-of-salad)
आजच्या पिढीतही माधुरीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. माधुरी आपल्या सौंदर्याप्रमाणेच आपल्या शरीराची देखील काळजी घेत असते. वयाच्या ५४ व्या वर्षी देखील ती अधिकच सुंदर आणि तरुण दिसत आहे. माधुरी ही आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष देते. त्याचबरोबर ती ते काटेकोरपणे पाळते. यासाठी ती तिच्या रोजच्या आहारात सकस आणि संतुलित आहार करण्यास प्राधान्य देते.
माधुरीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्या हातातील प्लेटमध्ये स्वादिष्ट सॅलड दिसत आहे. या पोस्ट केलेल्या फोटोत टोमॅटो, तुळशीची पाने आणि मोझारोला चीज घालून बनवलेले एक स्वादिष्ट इटालियन शैलीतील कॅप्रेस सॅलड बनवले होते.
माधुरीने हा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझे आवडते टोमॅटो मोझरेला सॅलेड.’ माधुरीने हे सॅलेड अतिशय छान पद्धतीने सादर केले गेले. माधुरीने पुढे कॅप्शनमध्ये असेही लिहिले की, ‘आयुष्यात योग्य निवड करणे नेहमीच गरजेचे असते. यावेळीही सॅलडमध्ये टोमॅटोसोबतच चेरी देखील आहे. हे ताजे आणि स्वादिष्ट आहे.’ याअगोदरही माधुरीने व्हॅनिला आइस्क्रीमचे फ्रूटी डेझर्टचा एक फोटोही शेअर केला होता.
अभिनेत्री माधुरी दीक्षितचे इंस्टाग्रामवर जवळजवळ २९.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याचबरोबर माधुरी नेहमी तिच्या फिटनेसशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना प्रेरणा मिळते. माधुरी स्वतः तिच्या चाहत्यांना फिट आणि हेल्दी राहण्याचा सल्ला आणि कानमंत्र देत असते.
काय आहे कॅप्रीज सॅलेड?
कॅप्रीज सॅलेड हे इटालियन परंपरेतील सर्वात प्रसिद्ध सॅलड आहे. हे मोझझेरेला आणि टोमॅटोसारख्या घटकांपासून तयार होते. हे सॅलड मुख्यतः उन्हाळ्यात खायला लोकांना जास्त आवडते. इटलीमध्ये, हे सहसा साइड डिश म्हणून नाहीतर अँटीपास्टो स्टार्टर म्हणून दिले जाते.
विशेष म्हणजे या डिशमध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि त्यात वापरलेले सर्व घटक हेल्दी देखील असतात. कॅप्रेस सॅलडच्या एका सर्व्हिंगमध्ये एकूण ६ ग्रॅम कार्बोहायड्रेट, ५ ग्रॅम नेट कार्बोहायड्रेट, ८ ग्रॅम फॅट, ७ ग्रॅम प्रथिने आणि १२० कॅलरीज असतात. कॅप्रीज सॅलड हे आरोग्याच्या दृष्टीकोनातून खूप फायदेशीर असते. टोमॅटो, तुळस आणि ताजे मोझारेला हे कॅप्रीजमधील तीन मुख्य घटक आहेत. हे प्रत्येक पदार्थ आरोग्यासाठी खूप चांगले असतात.
टोमॅटो
टोमॅटो हे आपल्या रोजच्या जीवनसत्वाचा उत्तम स्रोत आहे. टोमॅटोच्या एका सर्व्हिंगमुळे आपल्याला रोजच्या व्हिटॅमिन सीच्या प्रमाणापैकी ४० टक्के प्रमाण मिळते. हे पोटॅशियम, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ए ची कमतरता भरून काढतात. टोमॅटोला लायकोपीनपासून लाल रंग मिळतो, जो निरोगी हृदय आणि डोळ्यांच्या आरोग्याशी संबंधित आहे.
फ्रेश बेसिल
तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि नैसर्गिक इसेंशिअल ऑईल भरपूर प्रमाणात असतात. तुळस वाळवल्यावर त्यातील काही पोषक तत्वे नष्ट होतात. पण ताजी तुळस नेहमी कॅप्रेस सॅलडमध्ये वापरली जाते. त्यातील अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि तेलांची उपस्थिती कॅन्सर, संधिवात आणि हृदयविकाराचा धोका कमी करू शकते.
मोजोरेला चिझ
मोजोरेला चीज पोटॅशियम, लोह, सोडियम आणि क्लोराईडने समृद्ध आहे. त्यात तुमच्या दैनंदिन गरजेच्या १८ टक्के कॅल्शियम फक्त एका सर्व्हिंगमध्ये असते. मोझारेलामधील फॉस्फरस तुमच्या शरीराला कॅल्शियम पुरवते. हे प्रथिनांनी भरलेले आहे. याच्या सेवनाने आपल्याला उत्साही वाटू लागते आहे. जर तुम्हाला ही माधुरी दीक्षितसारखे सुंदर आणि फिट दिसायचे असेल तर आठवड्यातून एकदा या इटालियन सॅलडचा आहारात नक्की समावेश करा. त्यामुळे शरीराला खूप फायदा होईल.