(MPSC): गुरुवारी झालेल्या कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आज सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला जात आहे. मात्र, यानंतर फक्त कृष्ण जन्माष्टमिलाच नाही तर वर्षभरात कधीही दहीहंडीच्या स्पर्धा आयोजित केल्या जाऊ शकतात. दहिहंडीचा आता साहसी क्रीडा प्रकारात समावेश करण्यात आला आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १८ ऑगस्टला विधानसभेत केली.
दहीहंडी आता वर्षभर खेळता येऊ शकते. तसेच या खेळात सहभागी खेळाडू अर्थात गोविंदांना शासनाच्या योजनांचा लाभही मिळणार आहे. यामध्ये गोविंदांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षण असेल अशी घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. या निर्णयाला अनेकांनी विरोधही केला आहे. त्याचप्रमाणे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडूनही विरोध होत आहे.
एमपीएससीच्या समन्वय समितीकडून महाराष्ट्र राज्याच्या ट्विटर हँडलवर या संदर्भातील ट्विट करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, रविकांत वर्पे, आमदार रोहित पवार, काँग्रेस नेते सत्यजीत तांबे, भाजपनेते केशव उपाध्ये, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जितेंद्र आव्हाड, सीएमओ आणि रामराजे शिंदे यांना टॅग करण्यात आले आहे. ‘त्वरित हा निर्णय मागे घेण्यात यावा’ असंही ट्विट मध्ये लिहलंय.
https://twitter.com/Mpsc_Andolan/status/1560264166099009537?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1560265167124185094%7Ctwgr%5E857bfc6be0e064c7f8a30e1b9f7561147e36e58a%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmaharashtra%2Fmpsc-student-agressive-on-govinda-reservation-in-job-rad88
दरम्यान, दहिहंडीवेळी जर एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाला तर त्याला शासनाकडून १० लाख रुपये मदत देण्यात येईल. तसेच जर एखादा गोविंदा खूप जखमी झाला तर त्याला साडेसात लाख रुपये देण्यात येईल. अपघातात अपंगत्व आलं तर पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन सादर केलेलं आहे.
गोविंदा उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करुन ‘प्रो गोविंदा’ स्पर्धा राबवण्यात याव्या. तसेच या स्पर्धा राज्य शासनाकडून राबवण्यात येतील. या स्पर्धकांना बक्षिसाची रक्कम शासनाकडून मिळेल. त्याचबरोबर इतर खेळांप्रमाणं या गोविंदांनादेखील शासकीय नोकऱ्यांमध्ये ५ टक्के कोट्याचा लाभ घेता येईल. तसेच इतर सुविधांचाही लाभ घेता येईल, असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. दहिहंडीचा समावेश साहसी क्रीडा प्रकारात करण्यात यावा अशी मागणी गोविंदांकडूनच मुख्यमंत्र्यांना करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
Pradeep Patwardhan : पतीच्या निधनानंतर प्रचंड दुखाःत बुडालीय प्रदीप पटवर्धनांची घटस्फोटीत पत्नी; म्हणाली ते खूप लवकर…
politics: भाजपचा शिंदे गटाला झटका; राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या यादीत शिंदे गटाला फक्त ‘एवढ्या’ जागा?
Yuzvendra Chahal : युझवेंद्र चहल आणि त्याची बायको धनश्री यांच्यात ‘या’ खेळाडूमुळे आलाय दुरावा? चर्चांना उधान
politics: भाजपचा शिंदे गटाला झटका; राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या यादीत शिंदे गटाला फक्त ‘एवढ्या’ जागा?