Share

उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला एकत्र आणण्यासाठी ‘ही’ अभिनेत्री मैदानात, मोदींना घातलं साकडं

सध्या महाराष्ट्र राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत युती करून सत्ता स्थापन केली. यामुळे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. सध्या मुख्यमंत्री शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद जास्तीच वाढत जात आहेत.

असे असताना शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. शिवसेना जोडून लढली तर शिवसैनिकाला आनंद आहे. असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे. शिवाय त्यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी अशी आशा देखील व्यक्त केली आहे.

दिपाली सय्यद यांनी ट्विट केलं आहे, त्यात त्यांनी लिहिले आहे की, शिवसेना तोडुन लढण्यापेक्षा जोडुन लढली तर शिवसैनिकाला आनंद आहे. आदरणीय उद्धव साहेब व शिंदेसाहेब यांना एकत्र करण्यासाठी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांनी व पक्षा बाहेरून मा. नरेंद्र मोदी साहेबांनी मध्यस्थी करावी, मोदी साहेबांचा शब्द उद्धव साहेब व शिंदे साहेब टाळणार नाहीत हिच एक आशा आहे.

https://twitter.com/deepalisayed/status/1545025040059887617?t=Leccb4XiA4JQmh9dPwXHqA&s=19

दरम्यान, राज्यात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या चालू आहेत. भाजप मधील काही नेते देखील बंडखोर आमदारांची ढाल बनून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत आहेत.

या पार्श्वभूमीवर देखील दिपाली सय्यद यांनी ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी लिहिले आहे की, मला माननीय एकनाथ शिंदे साहेब कालही आदरणीय होते, आजही आदरणीय आहेत आणि उद्याही राहतील, असे त्यांनी प्रथम ठळक शब्दांत लिहिले आहे.

त्यानंतर त्यांनी लिहिले की, पण जर शिवसेनेच्या आमदारांना ढाल समजून किरीट सोमय्या आणि भाजपचे दोन अन्य वाचाळवीर आदरणीय उद्धवसाहेब आणि शिवसेनेवर टीका करतील तर त्यांना एवढंच सांगणं आहे की आमच्यातील शिवसेना आजही जिवंत आहे. उगाच कळ काढू नका.

आदरणी शिंदे साहेबांनी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका. भाजप आमची शत्रू नाही. परंतु वाचाळवीरांना माफी मिळणार नाही. भविष्यात काय होईल माहिती नाही, पण भाजपने याची दखल घेणे गरजेचे आहे. असे दिपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now