Tirupati balaji | तिरूपती बालाजी परिसरातील एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये असे दिसते की, काही जण तिरूपती बालाजी देवस्थानचे दर्शन घ्यायला गेले होते. पण त्यांना रस्त्यात अडवण्यात आलं. तिरुपती बालाजी देवस्थानचे दर्शन घेण्यापासून त्यांना रोखण्यात आलं.
त्यांची चेकपोस्टवरच गाडी अडवण्यात आली. या व्यक्तीने असे सांगितले की, त्यांच्या गाडीत छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती होती. स्टेअरिंगच्या वरच्या बाजूला ही छोटी मुर्ती बसवलेली होती. ती मुर्ती पाहून त्यांची गाडी चेकपोस्टवर थांबवण्यात आली.
चेकपोस्टवर त्यांना सांगण्यात आलं की, तुम्हाला तिरूमाला देवस्थानाला जायचं असेल तर ही मुर्ती काढावी लागेल. चेकपोस्टवरील अधिकाऱ्यांनी त्यांना असं सांगितलं असं त्या व्यक्तीने व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
यामध्ये त्या व्यक्तीने संपुर्ण घटनाक्रम सांगितला आहे. त्याने सांगितलं की, त्यांची गाडी अडवल्यानंतर त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यालाही फोन लावला होता. पण त्या अधिकाऱ्यानेही तेच सांगितलं. तो म्हणाला की, गाडीतील मुर्ती काढल्याशिवाय तिरूमला दिवस्थानला जाता येणार नाही.
https://www.facebook.com/100010794519952/videos/611827346966057/
या घटनेमुळे महाराष्ट्रातील नागरीक संतापले आहेत. भडकलेल्या नागरिकांनी तिरुमला देवस्थानच्या परिसरात लागलेले गाडीवरचे देवस्थानचे फोटोही फाडून टाकले होते. नागरीक म्हणाले की, जर शिवाजी महाराजांची फोटो, मुर्ती चालत नाही तर देवांचे फोटोही गाडीवर नको, असं म्हणत संतप्त नागरिकांनी देवाचे फोटो नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
तसेच तिरूमला देवस्थानचे फोटोही त्यांनी बॅनरवरून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे अनेक लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. पण हा व्हिडीओ खरा आहे की खोटा याबद्दल माहिती अदयाप मिळालेली नाही. या व्हिडीओबद्दल तपास होताच सर्व गोष्टी डोळ्यासमोर येतील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://www.facebook.com/100010794519952/videos/391214759773370/
महत्वाच्या बातम्या
मविआची साथ सोडून शिवसेना स्वबळावर लढणार? ठाकरेंच्या जवळच्या नेत्याचे मोठे वक्तव्य
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवण्यासाठी वशीला..; प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने उघड केले सत्य
करिअरमधील तिसरा नॅशनल अवॉर्ड जिंकताच अजय देवगणने सांगितली ही गोष्ट, म्हणाला…