Share

Tirupati balaji: शिवरायांची मुर्ती असल्यानं गाडी अडवली? तिरूमला देवस्थानने आरोप फेटाळत सांगीतला घटनाक्रम

तिरूपती बालाजी (tirupati balaji) परिसरातील एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये असे दिसते की, काही जण तिरूपती बालाजी देवस्थानचे दर्शन घ्यायला गेले होते. पण त्यांना रस्त्यात अडवण्यात आलं. तिरुपती बालाजी देवस्थानचे दर्शन घेण्यापासून त्यांना रोखण्यात आलं.

त्यांची चेकपोस्टवरच गाडी अडवण्यात आली. या व्यक्तीने असे सांगितले की, त्यांच्या गाडीत छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती होती. स्टेअरिंगच्या वरच्या बाजूला ही छोटी मुर्ती बसवलेली होती. ती मुर्ती पाहून त्यांची गाडी चेकपोस्टवर थांबवण्यात आली.

मंदिरात प्रवेश करायचा असेल तर गाडीतील मुर्ती काढावी लागेल असं त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. मात्र आता याबाबत तिरूमला तिरूपती संस्थानाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. संस्थानाचे म्हणणे आहे की, हे सगळे केलेले आरोप खोटे आहेत.

तिरूमला तिरूपती संस्थानाच्या जनसंपर्क कार्यालयाने याबाबत स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, भाविकांनी गाडीमध्ये मुर्ती, छायाचित्रे, राजकीय पक्षाचे ध्वज आणि चिन्हे, मुर्तीपूजक प्रचार साहित्य नेण्यास मनाई आहे. त्यांनी एक पत्रक जारी केले आहे ज्यामध्ये लिहीले आहे की, दोन दिवसांपुर्वी महाराष्ट्रातील वाहन अलिपिरी चेक पॉइंटवर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अडवून त्यांची तपासणी केली होती.

यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी काळ्या रंगातील पुतळा ओळखला. ती मुर्ती छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचे कर्मचाऱ्यांनी ओळखले आणि नंतर त्यांनी प्रवेश देण्यात आला. त्या व्यक्तीला असे सांगण्यात आले होते की, देवी देवतांची चित्रे वगळता व्यक्तींचे मुर्ती राजकीय पक्षांचे ध्वज आणि इतर चिन्हे प्रदर्शित करू नयेत, असे सांगण्यात आले होते.

भक्ताला असे सांगितल्यानंतर या भक्ताने आमच्यावर शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप केला आणि व्हिडीओ बनवून इतरांना भडकवण्यासाठी तो व्हायरल केला, असं संस्थानाने पत्रकात म्हणलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. शिवप्रेमी संतापले होते.

https://www.facebook.com/100013331824114/posts/pfbid0neg8bsvQyT5sYrAXY8dEHcnFT1ENR6TiHGgMhZj4h4Ku1HxXvqUVKEv18VdgDeRhl/

महत्वाच्या बातम्या
महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यामुळे माझ्यात लढण्याची हिंमत आली; आदित्य ठाकरेंची भर सभेत कबुली
‘बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमापोटीच शिवसेना फुटली’; राज ठाकरेंचा थेट आरोप
Afghanistan: ‘सेक्ससाठी लग्न करतात तालिबानी’, महिला पत्रकाराने खुलासा करताच मिळाली तिला भयानक सजा
रणवीर सिंगने न्युड फोटोशुट करून धुमाकूळ घातल्यानंतर दीपिकाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…

इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now