मालाड येथील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे (Tipu Sultan) नाव देण्यावरुन निर्माण झालेला वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला आहे.(tipu sultan name to ground bjp, bajrang dal angry)
या आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी बेस्टच्या बसेसची हवा काढली आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन परिसर मोकळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही याठिकाणी अजून भाजप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात सध्या तणाव निर्माण झाला आहे.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या पुढाकाराने मालाड येथील एका क्रीडा संकुलाचे काम करण्यात आले होते. या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानाचे नाव देण्यात आल्याचे फलक या परिसरात लावण्यात आले होते. त्यावरुन कालपासून मुंबईमधील वातावरण तापायला सुरुवात झाली होती. पण पालकमंत्री अस्लम शेख यांनी क्रीडा संकुलाला टिपू सुलतानाचे नाव देण्यात काहीही गैर नसल्याचे म्हटले आहे.
काहीवेळापूर्वीच भाजप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या क्रीडा संकुलाच्या बाहेर येत घोषणबाजीला सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आंदोलकांनी महामार्गावरील वाहतूक रोखून धरण्यास सुरवात केली. त्यामुळे या भागात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला.
या आंदोलनाबद्दल मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की, “पहिल्यांदा तिथं कार्यक्रम काय आहे, ते पाहा. त्या मैदानात विकास काम सुरु आहे. तिथं नामकरणाचा कार्यक्रम आलाच कुठे? ज्या ठिकाणी खराब, घाणेरडी जागा होती ती व्यवस्थित करुन त्या जागेवर क्रीडा संकुल उभारण्यात आला आहे. जे मैदान गेल्या पंधरा वर्षांपासून टिपू सुलतान यांच्या नावानं आहे, ज्याचं मी उद्घाटन करतो आहे.”
“माझं काम लोकांपर्यंत पोहोचूच नये म्हणून हा सगळा गोंधळ घतला जात आहे. सत्तर वर्षात कधी टिपू सुलनातच्या नावाला विरोध झाला नाही मग आत्ताच नावांवरुन का गोंधळ सुरु झाला आहे? उलट यापूर्वी भाजपच्याच नगरसेवकांनी आणि नेत्यांनी मुंबईतल्या रस्त्याला टिपू सुलतान यांचं नाव दिलं आहे”, असे देखील पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले.
“आंदोलकांकडून कांगावा सुरु आहे. कर्नाटकात टिपू सुलतानचा पुतळा आहे तो तिथल्या भाजप सरकारनं उतरुन दाखवावा. आजच्या प्रजासत्ताक दिनी आपण काय करतोय याचंही भान यांना उरलेलं नाही. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून हा वाद निर्माण केला जात आहे”. असा आरोप शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
दत्तक घेतलेल्या मुलीला खरे आई-वडील गेले घेऊन, सावत्र आईने तिच्या वाढदिवशीच सोडले प्राण
गरीब मुलांना ५०० च्या नोटा वाटणं नेहा कक्करला पडलं महागात, झाली भयानक अवस्था; पहा व्हिडिओ
राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला खास,सुदेश भोसलेंच्या गाण्यासह ‘या’ गोष्टींचा होता समावेश