टिकटॉक स्टार संतोष मुंडे आणि त्याचा मित्र बाबुराव मुंडे यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भोगलवाडी येथे आज (ता. 13) सायंकाळी 6.30 च्या दरम्यान घडली. या घटनेने सर्वत्र हाहाकार माजला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, टिक टॉक स्टार संतोष मुंडे व त्यांचे मित्र बाबुराव मुंडे हे धारूर तालुक्यातील भोगलवाडी ते काळेचीवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या विजेच्या डीपीचा फ्यूज लावण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक वीज पडल्याने दोघांनाही विजेचा धक्का बसला आणि दुर्दैवाने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच समाजातून तीव्र दु:ख व्यक्त केले जात आहे. टिक टॉकच्या माध्यमातून संतोष मुंडे यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचा खूप फॉलोअर्स असून त्यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.
बीड येथील संतोष मुंडे याने टिक टॉक स्टार म्हणून अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. संतोष यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. संतोषसोबत बाबुराव मुंडे यांचाही मृत्यू झाला आहे.
आज (13 डिसेंबर 2022) संध्याकाळी डीपीचा फ्यूज बदलण्यासाठी गेले असता अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने संतोष आणि बाबूराव या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची धारूर पोलिसात नोंद करण्यात येत आहे.
संतोष मुंडे हे प्रसिद्ध टिकटॉक स्टार असून त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे घडली. यात संतोष व बाबुराव यांचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात नसून घातपात असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. कारण अल्पावधीतच टिक टॉकच्या माध्यमातून संतोषने स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे.
संतोष त्याच्या मस्त शैलीसाठी ओळखला जात होता. संतोषचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांनी खऱ्या ग्रामीण शैलीत मनोरंजन केले. तो नेहमी शेतात बसून टिक टॉकवर व्हिडिओ बनवत असे.
धारूर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. संतोषच्या निधनावर त्याच्या चाहत्यांना अजूनही विश्वास बसत नाहीये. संतोषच्या मृत्यूची बातमी समजताच पोलीस भोगलवाडीत पोहोचले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
samruddhi mahamarg : आधी अपघात झाला आता ट्रक अडकला, बाहेर काढण्यासाठी समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली खोदला खड्डा
samruddhi mahamarg : मोदींनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले त्याच ठिकाणी पहील्याच दिवशी झाला भीषण अपघात
पैशांचा पाऊस! १ रूपयांच्या स्टाॅकने दिला बंपर परतावा; एका झटक्यात बदलले नशीब