Share

खुल्ताबादेतील औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; जाणून घ्या का घेतला हा निर्णय

राज्यात आधीच भोंग्यावरून वातावरण तापलेले असताना, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी गुरुवारी औरंगाबाद येऊन औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, काही लोक औरंगजेबच्या कबरीवर चाल करून जाणार अशी अफवा असल्याने, अखेरीस पर्यटकांसाठी कबर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद येऊन तेथील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. तेव्हापासून राजकीय वातावरण अधिकच तापलं. विरोधक आणि आणि सत्ताधारी यांच्यात यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. दरम्यान, औरंगजेबच्या कबरीजवळ काल तणाव निर्माण झाला.

कोणीतरी कबरीवर चाल करून जाणार अशी अफवा नागरिकांच्या कानावर पडताच काल स्थानिक नागरिक कबरीच्या ठिकाणी जमायला सुरवात झाली होती. त्यामुळे पोलिसांनीही तात्काळ औरंगजेब यांच्या कबरीकडे धाव घेतली. पोलिसांनी काही झाले नाही काही होणार नाही असे समजावत नागरिकांना तिथून बाहेर जाण्यास भाग पाडले आहे.

आता काही पोलिसांचा त्या ठिकाणी बंदोबस्त देण्यात आला आहे. दरम्यान, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबादमध्ये येऊन कबरीवर दर्शन घेतले, यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट केले. त्यांनी या मुद्यावरून महाराष्ट्र सरकारला नामर्दांचे सरकार म्हटलं आहे.

तसेच हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी देखील या मुद्यावरून खळबळजनक वक्तव्य केले होते. आनंद दवे म्हणाले, संभाजी राजांना ठार मारणाऱ्या, आमच्या शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या, छत्रपतींच्या पूर्ण परिवारालाच शत्रू समजणाऱ्या, आमच्या दैवतांवर कुऱ्हाड चालवणाऱ्या राज्याच्या सर्वात मोठ्या शत्रूची कबर इथे महाराष्ट्रात कशाला हवी? असा त्यांनी सवाल केला होता.

शिवाय, अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद दौऱ्यात औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती, म्हणाले, तुम्हाला घाबरायची गरज नाही. जो भी कुत्ता, जैसे भी भोंकता है, उसे भोंकने दो. मी त्यांच्यावर टीका काय करू मी त्यांच्यावर टीका करावी तेवढी त्याची औकात नाही. असे ओवैसी म्हणाले होते. त्यामुळे राजकीय वातावरण बिघडले. संभाव्य धोका लक्षात घेऊन कबर बंद करण्यात आली.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now