Share

शिळ्या चपात्या फेकून देताय? त्याआधी वाचा शिळ्या चपात्या खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

आपल्याकडे चहा चपाती हा सर्वांचाच आवडता नाष्टा आहे. शिळ्या चपातीवर तूप लावून तिला चहात बुडवून खाणे प्रत्येकालाच आवडते. मात्र ही शिळी चपाती आरोग्यसाठीही तितकीच फायदेशीर आहे. या शिळ्या चपातीमुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. कित्येक आजारांसाठी शिळी चपाती औषध म्हणून काम करते.

आरोग्य तज्ञांनी देखील शिळ्या चपातीत अनेक पौष्टीक गुणधर्म असल्याचा दावा केला आहे. आज आपण हेच गुणधर्म जाणून घेणार आहोत. सांगण्यात येते की, ज्या व्यक्तीला डायबिटीज आहे अशा व्यक्तीने जर शिळी चपाती आहारात आणली तर साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे साखर असलेल्या व्यक्तींनी नाष्ट्यात शिळी चपाती तीन दिवसातून एकदातरी खावी.

तसेच, जर व्यक्तीला पोटाचे विकार असतील तर त्याने शिळी चपाती खावी. व्यक्तीला जर अॅसिडीटी, बद्धकोष्ठता असेल तर अशा व्यक्तींनी सकाळी थंड दुधासोबत शिळी चपाती खावी. यामुळे त्यांच्या अॅसिडीटीवर नियंत्रण येण्यास मदत होते.

याचबरोबर जर एखाद्याला रक्तदाबाची अर्थात ब्लड प्रेशरची समस्या असेल तर अशा व्यक्तींनी शिळ्या चपात्या खाव्यात. कारण की, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास शिळ्या चपातीमध्ये असणारे पौष्टिक घटक मदत करत असतात. दुधासोबत शिळी चपाती खाणे आरोग्यसाठी नेहमी चांगले असते.

यात शरीराला पौष्टीक गुणधर्म मिळणे नेहमी आरोग्यासाठी फायद्याचे असते. पौष्टीक गुणधर्म चपातीमधून व्यक्तीला मिळून जातात. सकाळी शिळी चपाती खाल्यास व्यक्तीला लवकर भूक लागत नाही. यामुळे दुपार पर्यंत तो त्यांची व्यवस्थित कामे करु शकतो. परंतु चपाती ताजी असेल आणि ती तुम्ही 10 किंवा 15 तासांनी खात असाल तर त्याचा अर्थात तुम्हाला त्रास होऊ शकतो.

त्यामुळे जास्त शिळी चपाती खाणेही आरोग्याला हानीकारक असते. अनेकवेळा व्यक्ती शरीराला पौष्टीक गुणधर्म मिळण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीचे प्रोडक्ट वापरतात. परंतु योग्य गुणधर्म घरात बनवलेल्या अन्नातूनच मिळतात. फक्त त्या अन्नाचा वापर कितपत आणि कधी करायला हवा हे आपल्याला माहित हवे.

महत्वाच्या बातम्या
औरंगाबादमध्ये कुरियर कंपनीमार्फत मागवल्या जात आहेत तलवारी; शस्रांचा साठा पाहून पोलिसही हादरले
महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन, तीन शिलेदारांवर महत्वाची जबाबदारी
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? काँग्रेससह शिवसेनेचे ९० टक्के आमदार नाराज, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
पॅनकार्ड आधार कार्डला जोडण्यासाठी आजचाच कालावधी, नाहीतर भरावा लागेल ‘इतका’ भुर्दंड

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now