नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबड पोलीस ठाणे हद्दीत जुने सिडको परिसरात संदीप आठवले या २२ वर्षे भाजीविक्रेत्या युवकाचा खून करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मृत संदीपच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. आरोपींना ताब्यात घेणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस देखील उपस्थित होते.
जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठ्या संख्येने मृताचे नातेवाईक जमले होते. भरदिवसा एका भाजी विक्रेत्याची हत्या करण्यात आल्याने पोलिसांचा वचक कमी झाला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये ६ ते ७ हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हा हल्ला केला.
संदीप आठवले (वय २२) असे हत्या झालेल्या भाजी विक्रेत्याचे नाव आहे. जुन्या सिडकोतील लेखा नगर येथील शॉपिंग सेंटर चौकात ही घटना घडली आहे. कशामुळे हत्या झाली याबाबत अजून माहीती समोर आली नाही.
हल्लेखोरांनी भाजी विक्रेता आठवले याच्यावर धारधार शस्त्राने जोरदार हल्ला केला. यामुळे ते जागीच मोठ्या प्रमाणावर जखमी झाले होते. पोटात आणि मानेवर जोरदार वार करण्यात आल्याने आठवले याचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्याची माहिती मिळताच अंबड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, घटनेनंतर सहायक पोलीस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त असा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला होता. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. सध्या नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक दहशतीच्या वातावरणाखाली वावरत आहेत.