Share

Karwa Chauth: एकाच पतीच्या तीन बायका, तिघी मिळून साजरा करतात करवा चौथ, आपल्या पतीला मानतात देव

Karwa Chauth, Three Wives, Uttar Pradesh, Raja Dashrath/ एका नवऱ्याच्या तीन बायका किंवा एका बायकोच्या पाच नवऱ्यांची कथा तुम्ही ऐकल्या असतील, पण आजच्या युगात असं करणं खूप अवघड आहे. चित्रकूटमधलं एक कुटुंब असं आहे, जिथे एका पुरुषाला तीन बायका आहेत. या तिन्ही बायका मिळून करवा चौथचे व्रत ठेवतात. चाळणीतून चंद्र आणि नवरा एकत्र पाहतात. नवराही तिघींना एकत्र पाणी पाजून उपवास सोडवतो.

हे अनोखे प्रकरण सतना जिल्ह्यातील चित्रकूटचे आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेले चित्रकूटचे हे कुटुंब अनोखे आहे. आजच्या युगात एक बायको लोकांना सांभाळता येत नाही, तर कृष्णा नावाच्या या तरुणाच्या तीन बायका एकत्र राहतात. तिन्ही बायका सख्ख्या बहिणी आहेत, शोभा, रीना आणि पिंकी अशी त्यांची नावे आहेत.

तिन्ही बहिणी बुंदेलखंड विद्यापीठातून पदव्युत्तर आहेत. तिन्ही बहिणींनी 12 वर्षांपूर्वी कृष्णाला पती म्हणून स्वीकारले होते. तिन्ही बायका आपल्या पतीला देवाप्रमाणे दशरथाचा अवतार मानतात. करवा चौथ आला की या कुटुंबाचा फोटो व्हायरल होतो. यावेळीही त्यांचे फोटो व्हायरल होत आहे.

या तिन्ही बहिणी एकाच तरुणाशी लग्न करून खूप आनंदी आहेत. तर नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी हा सणही एकत्र साजरा करतात. जो कोणी ऐकेल त्याला आश्चर्य वाटते की, या युगात एक नवरा आणि एक बायको एकमेकांसोबत आनंदी राहू शकत नाहीत, तर एका पतीसोबत तीन बायका कशा आनंदी असतील. एकाच पतीसोबत तीन बहिणी एकत्र राहणे ही जगातील अनोखी घटना आहे.

अयोध्येचा राजा दशरथ यांना आदर्श मानून, चित्रकूटच्या तीन सख्ख्या बहिणींनी एकाच तरुणाशी लग्न तर केलेच, पण सुहासिनींचा सण करवा चौथ अनेक वर्षांपासून एकत्र साजरा करत आहेत. पाश्चात्य संस्कृतीच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे भारतात संयुक्त कुटुंबांची प्राचीन परंपरा संपुष्टात येत असताना, तीन बहिणींनी 15 वर्षांहून अधिक काळ विवाह करून समाजाला एक नवा संदेश दिला आहे.

लोक म्हणतात की त्यांचे लग्न 15 वर्षांपूर्वी प्रसिद्धीच्या झोतात आले जेव्हा तीन बहिणींनी कृष्णाशी लग्न केले. यानंतर नातेवाईकांनी टोमणे मारण्यास सुरुवात केली. लोक कृष्णाच्या कुटुंबाकडे सर्व बाजूंनी वाईट नजरेने पाहू लागले. तेव्हा हे लग्न फार काळ टिकू शकणार नाही, असे म्हटले जात होते, मात्र तिन्ही बहिणींच्या समजूतदारपणाने कुटुंबाला आणि समाजाला खोट ठरवल.

कृष्णाशी लग्न करून या तिन्ही बहिणी पूर्ण समर्पणाने त्याच्यासोबत आयुष्य तर जगत आहेतच पण देवाप्रमाणे त्याची पूजाही करत आहेत. 15 वर्षांच्या वैवाहिक जीवनात तिन्ही बहिणींना प्रत्येकी दोन मुलेही आहेत. चित्रकूटमध्ये, एक पती आणि त्याच्या तीन बायका असलेले हे कुटुंब स्वतःला सत्ययुग आणि त्रेतायुगातील राजा-महाराजांसारखे समजते. लोधवाडा येथील कांशीराम कॉलनीमध्ये संपूर्ण कुटुंब आनंदाने राहत आहे.

सख्या बहिणी आपल्या पतीला सामान्य मानत नाहीत तर दैवी पुरुष मानतात. महाकालीकडून मिळालेल्या सामर्थ्याच्या बळावर त्यांना हे जगाला दाखवून द्यायचे आहे की आजही महिलांनी आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवायला शिकले तर सामान्य माणसालाही दशरथासारखा महाराज बनवता येईल.

अनेक वर्षांपासून हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे सांगण्यात आले. जेव्हा जेव्हा करवा चौथचा उपवास येतो तेव्हा चित्रकूटची गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते. काही वर्षांपूर्वी हा फोटो कुटुंबातील एका व्यक्तीने मीडियाला दिला होता. त्यानंतर आजही हाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
Eknath Shinde: शपथ घेताच शिंदे गटातील मंत्री रुग्णालयात दाखल, पुणे दौऱ्यावर असताना बिघडली तब्येत
Mukesh Khanna : ‘तुम्ही मुर्ख आहात’, नसीरुद्दीन शाह यांच्या पत्नीवर भडकला ‘शक्तीमान’, वाचा नेमकं काय घडलं?
Mukesh Khanna : ‘करवा चौथ’ची खिल्ली उडवणाऱ्या रत्ना पाठक यांना मुकेश खन्नांनी झाप झाप झापलं, म्हणाले…

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now