तीन मित्रांच्या अपघाती मृत्यूने सोलापूर जिल्हयावर शोककळा पसरली आहे. मंगळवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ बोरघाटात भीषण अपघात होऊन चार जण जागीच ठार झाले. तर तिघे गंभीर जखमी झाले. सकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला.
या भीषण अपघातात गौरव खरात, सौरव तुळसे आणि सिद्धार्थ राजगुरू यांचं निधन झालं. मृत गौरव खरात हे काँग्रेस पक्षाशी संबंधित होते. नितीन राऊत यांना भेटण्यासाठी जात असताना अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती.
मंगळवारी पहाटे मुंबईच्या दिशेनं येणारी 6 वाहनं बोरघाटात एकमेकांना धडकली. या अपघाताचा तडाखा इतका भीषण होता की यामध्ये कारचा पूर्णपणे चुराडा झाला. यात कारमधील चारही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच जखमींवर एम. जी. एम. रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली. यात ट्रक आणि टेम्पोच्या दरम्यान आल्याने कारचा पूर्णपणे चुराडा झाला. या भीषण अपघातामध्ये दोन मोठ्या वाहनांच्यादरम्यान चिरडल्या गेलेल्या कारमधील चौघेही जागीच ठार झाले.
तसेच मागील पंधरा दिवसांपूर्वी मावळ येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला होता. त्या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नारायणगाव जुन्नर रोडवर झालेल्या अपघातातही दोघेजण गंभीर जखमी झाले होते.
धक्कादायक बाब म्हणजे ३० जानेवारीला मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली होती. हा अपघात इतका भीषण होता की यामध्येएका कारचा चुराडा झाला. कंटेनर आणि कारमध्ये धडक झाल्यामुळे हा शिलाटणे गावाजवळ ही घटना घडली होती.
महत्त्वाच्या बातम्या
बप्पी लहरी यांच्याकडे होतं तब्बल एवढ्या लाखांचं सोनं, चहा पिण्यासाठी घेतला होता सोन्याचा टी सेट
नजर हटी दुर्घटना घटी! आई काढत होती फोटो, मागे स्विमींग पुलमध्ये बुडून २ वर्षांच्या लेकाचा मृत्यु
बाप बेटे जेलमध्ये जाणार, कोठडीचे सॅनिटायझेशन सुरु’, संजय राऊतांचा सोमय्यांना सूचक इशारा
संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरेंनी ‘या’ बड्या नेत्याला केला फोन, राजकीय वर्तुळात खळबळ