Share

ही दोस्ती तुटायची नाय! तीन मित्रांचा प्रवास ठरला अखेरचा; अपघाताचा थरार वाचून येईल अंगावर काटा

shrigonda

रविवारी रात्री एक वाजता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा (shrigonda) येथे भीषण अपघात झाला आहे. मित्राला सोडविण्यासाठी जात असताना उसाच्या ट्रेलरला पाठीमागून कारची धडक बसून झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन मित्रांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (three friends killed in car accident in shrigonda)

या अपघातात राहुल सुरेश आळेकर (वय- २२ ,श्रीगोंदा), केशव सायकर (वय- २२, काष्टी) आणि आकाश रावसाहेब खेतमाळीस (वय- १८, श्रीगोंदा) या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुलांच्या निधनाने कुटुंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.

राहुल आणि आकाश हे आपला मित्र केशव सायकरला घरी सोडविण्यासाठी काष्टीला जात असताना हा अपघात झाला. या भीषण तिनही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ऊसाच्या टेलरला पाठीमागून कार (Car Accident ) धडकल्याने भीषण अपघात झाला.

मात्र अजूनही या अपघाताचे नेमके कारण समजले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री श्रींगोदा काष्टी रस्त्यावरील हॉटेल अनन्या जवळ ऊसाच्या ट्रेलरला धडक दिल्यानं अपघात झाला. ही घटना मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळतात अनन्या हॉटेलमधील व्यक्तींना घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त युवकांना कारमधून बाहेर काढले. यावेळी केशव सोयकर आणि आकाश खेतमाळीस या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याच समोर आलं.

अपघात एवढा भीषण होता की, यात गाडीचे मोठे नुकसान झालेले आहे. धक्काडायक बाब म्हणजे या अपघातात तिनही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने श्रीगोंदा काष्टीत मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
..त्यामुळे मी त्या पेंटिंगला डोळे काढले, सात कोटींची पेंटींग खराब करणाऱ्या सुरक्षारक्षकाने केला खुलासा
किरीट सोमय्यांचं खुलं आव्हान “संजय राऊत यांनी हिंमत असेल तर उत्तर द्यावं की मुलीचे…”
प्रचार करू नका म्हणून मेसेज आले, पण कुठून आले हे सांगणार नाही; आदित्य ठाकरेंनी केलेल्या दाव्याने उडाली खळबळ
फिल्मी स्टाईलमध्ये भांग भरणारा तरुणच निघाला धोकेबाज; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत केले ‘हे’ भयानक कृत्य

इतर क्राईम राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now