नुकतच एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. अनौपचारिक गप्पांच्या या कार्यक्रमात शर्मिला ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबतचे अनेक किस्से शेअर केले. यावेळी बोलताना शर्मिला यांनी राज ठाकरेंना आलेल्या धमकीच्या फोनचा किस्सा सांगितला आहे.
हा किस्सा सांगताना शर्मिला ठाकरे म्हणतात, ‘राज ठाकरेंना दुबईहून जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता आणि तो फोन मीच उचलला होता, अशी आठवण शर्मिला यांनी सांगितली. ‘त्याला (राज ठाकरे) नीट राहायला सांगा नाहीतर बघून घेऊ अशी धमकी दिली होती,’ असे शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं.
हाच किस्सा सांगताना पुढे शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “आता मोबाइल वगैरे सारंकाही आहे. त्यावेळी सारंकाही लँडलाइनवर अवलंबून राहावं लागत असायचं. ते दोन-दोन महिने दौऱ्यावर असायचे आणि ते सर्किट हाऊसला गेल्यानंतर आमचं त्यांच्याशी बोलणं व्हायचं यासाठी आम्ही रात्रभर त्या फोनची वाट पाहायचो, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
दरम्यान, मोठ्या कार्यक्रमात भाषण करण्यापूर्वी हातपायाला घाम फुटत असल्याची कबुली राज ठाकरे यांनी दिली आहे. “हातपाय थंड पडलेले असतात. मला माहीती नसतं मी काय बोलणार आहे. मी उभं राहिल्यावर माझ्या तोंडातून काय येणार, काय बोलणार आहे, नसतं माहिती. मी बोलीनच याची गॅरंटी नाही” असं राज म्हणाले.
याचबरोबर भाषणपूर्वी मुद्दे काढलेले असतात. मी भाषणात बोलतो त्यावेळी मला काही दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. जर एखादा महत्त्वाचा मुद्दा राहिला असेल तर मागून सांगितले जाते असेही ते म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलताना आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला.