Share

फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत मोरे आहे..! मुलाला धमकी आल्यावर वसंत मोरे खवळले

vasant more

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे अशातच एक वेगळी बातमी समोर येत आहे. पुण्यातील मनसेचे नेते, माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांच्या मुलाला धमकीचं पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

वाचा नेमकं प्रकरण काय..? गेल्या काही दिवसांपासून मनसेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे चांगलेच चर्चेत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakare) यांच्या मशिदींवरील भोंग्याबाबतच्या भूमिकेवर वसंत मोरे यांनी नाराजी दर्शविली होती. त्यानंतर वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.

तर आता त्यांच्या मुलाला थेट धमकी देण्यात आली आहे. ‘सावध राहा रुपेश!’ अशा आशयाची एक चिठ्ठी रुपेश मोरे यांच्या कारवर ठेवण्यात आली होती. याप्रकरणी तात्काळ रुपेश मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात रितसर तक्रारीची नोंद केली आहे. तर आता पोलिसांकडून या प्रकरणाच्या कसून तपास सुरू आहे.

ही घटना ती दिवसापूर्वी घडली असल्याची माहिती मिळत आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोरे यांच्या मुलाला धमकीचं पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे. स्वःतः वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित याबाबतची माहिती दिली. वाचा वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट..!

“बाबा फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत ( तात्या ) मोरे आहे…!”, असं वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबत वसंत मोरे यांनी धमकी देण्यात आलेल्या चिठ्ठीचाही फोटो यासोबत पोस्ट केला आहे. सध्या वसंत मोरे यांचीही फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल होतं आहे.

दरम्यान, पुढे मोरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “सावध रहा रुपेश” आशी चिट्ठी लावून ठेवली जी रात्री घरी आल्यावर पाहिली… तसा तो कोणाच्या आध्यात मध्यात नसतो तरीही असे का ? हाच प्रश्न मनाला चटका लावून जातोय…, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
पॉवरफुल्ल अदानी बारामतीत! “दोन लुटारू भाई, अवघा देश लुटून खाई”; सदाभाऊंची जहरी टीका
IPLचे विजेतेपद पटकावल्यामुळे नाही तर, ‘या’ खास कारणामुळे पंड्याला केलय टिम इंडीयाचा कॅप्टन
मुकेश अंबानींचे पूर्ण कुटुंब खाते ‘या’ पद्धतीचे जेवण, कुकला मिळतो ‘इतका’ पगार, वाचून हैराण व्हाल
संगीतकार अतुलच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन, घेतली ‘ही’ ड्रीम बाईक, किंमत वाचून अवाक व्हाल

इतर क्राईम ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now