Share

‘विधानसभेला ज्यांचं डिपॉझिट जप्त झालं त्यांनी बोलू नये’; निलेश लंके यांनी पडळकरांची लायकीच काढली

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर मधील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर टीका केली होती. यावर आता निलेश लंके यांनी पडकर यांना प्रतिउत्तर दिलं आहे. लंके यांनी दिलेल्या उत्तराची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर मधील एका कार्यक्रमात निलेश लंके यांच्यावर टीका केली होती की, निलेश लंके यांना मी ओळखत नाही. ते कुठल्या गावाचे आहेत हे मला माहिती नाही. रावणाची लंका एकट्या हनुमानानं जाळली, लंकेंची लंका जाळण्यसाठी इथं जमलेले लोक पुरेसे आहेत. अशी टीका केली होती.

यावर आता निलेश लंके यांनी त्यांच्या भाषेत उत्तर दिलं आहे. निलेश लंके म्हणाले, आपल्या मर्यादा ओलांडल्या नाही पाहिजेत. तुम्ही माझ्या मतदारसंघात येऊन टीका करता, पण विधानसभेला तुमचं डिपॉझिट वाचलं का हे पाहावं. ज्यांना आपल्या मतदारसंघात पाय ठेवायला जागा आहे का ते पाहायचं.

विधानसभा निवडणुकीत किती मतं मिळतात ते पाहावं.  माझ्या मतदारसंघात लंका जाळायला निघालेत पण मी प्रस्थापितांच्या विरोधात लढून ६२ हजार मतांनी विजयी झाल्याचं निलेश लंके म्हणाले. तसेच म्हणाले, विधानसभेला ज्यांचं डिपॉझिट जप्त होतं त्यांनी बोलू नये.

आता निलेश लंके यांनी पडळकर यांना असं उत्तर देण्याचं कारण म्हणजे, लंके यांनी इथे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा दाखला दिला आहे. नेमकं त्यावेळेस काय घडलं होतं, ज्यामुळे लंके यांनी पडळकर यांना डिपॉझिट वाचलं का हे पाहावं असे म्हणाले, याबद्दल माहिती घेऊ.

तर, झाले असे की, गोपीचंद पडळकर यांनी २०१९ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत गोपीचंद पडळकरांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. अजित पवारांविरोधात भाजपनं पडळकर यांना उमेदवारी देत मोठी खेळी केली होती.

मात्र, बारामतीतील मतदारांनी अजित पवारांना पसंती देत गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला होता. निलेश लंके यांनी या २०१९ च्या निवडणुकीच्या निकालाचा दाखला देत गोपीचंद पडळकरांवर आता टीका केली आहे. गोपीचंद पडळकरांना त्यांचं डिपॉझिट वाचवता आलं नाही, त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन लंका जाळण्याची भाषा करु नये, असे त्यामुळेच लंके म्हणाले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now