मुख्यमंत्र्यांनी केली सर्वांना धक्का देणारी घोषणा; ‘हे’ असेल नवी मुंबई विमानतळाचे नाव

महाराष्ट्राच्या राजकारणाला हदरवून टाकणारी बंडखोरी घडून आली असताना उद्धव ठाकरे त्यातच अडकून पडले नाहीत, तर मुख्यमंत्री म्हणून त्यांचे जनतेप्रति असणारे कर्तव्य ते बजावत आहेत. मातोश्रीवर झालेल्या एका बैठकीतून हे अधिक ठळकपणे स्पष्ट होते. नवी मुंबई येथील विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासंदर्भात या बैठकीत निर्णय झाल्याचे स्पष्ट झाले. (This will be the name of Navi Mumbai Airport)

‘दि बा पाटील’ यांच्या नावाला माझा कसलाही विरोध नाही, असं म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या नावाला होकार दिला आहे. त्यांनी पुढे असं म्हंटल की , एकनाथने हे नाव दिलंय, त्याला माझा विरोध नाही. सध्या बंडखोरी करत गुवाहाटीत आमदारांसमवेत तळ ठोकून असणाऱ्या एकनाथ शिंदे यांची विमानतळाला नाव देण्याच्या प्रकरणात महत्वाची भूमिका असल्याचे यावरून स्पष्ट होते.

मध्यंतरी नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याचा विषय बराच चर्चेत होता. दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सर्व स्तरातून झाली होती. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असल्याने त्यांनी याबाबत विशेष लक्ष दिल्याचे बोलले जाते.

सिडकोने बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा प्रस्ताव मांडला. राज्यसरकार पण यासाठी आग्रही होते. मात्र भूमिपुत्रांनी याला विरोध केला, त्यासाठी आंदोलन केले. दि बा पाटील यांचे नाव देण्याची जोरदार मागणी केली, अखेर सरकारने त्यांची मागणी मान्य केली आहे.

दि बा पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. नवी मुंबई उभारणीवेळी सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलाच्या भावाने विकत घेत होते. त्यावेळी शेतकऱ्यांसाठी दि बा पाटील यांनी मोठा लढा उभा केला. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा चांगला भाव मिळवून दिला. प्रकल्पग्रस्तांना सरकारची मदत मिळवून दिली होती. कष्टकरी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्यभर काम करणाऱ्या दि बा पाटील यांची आठवण म्हणून विमानतळाला त्यांचे नाव देण्याचा भूमिपुत्रांच्या आग्रह होता.

नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देऊन महाराष्ट्र सरकार प्रकल्पग्रस्तांच्या मागणीला न्याय देत त्यांचा सन्मानच करत असल्याचे बोलले जाते आहे. मागील काही महिन्यांपासून स्थानिक सर्वपक्षीय कृती समिती प्रकल्पग्रस्त विरुद्ध राज्य सरकार असा नामकरणाबाबतचा वाद सुरु होता, मात्र मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे या वादास पूर्णविराम मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या-
विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या पोरीसोबत आता फिरतोय अर्जुन तेंडुलकर; फोटो व्हायरल
महाराष्ट्रातल्या राजकारणातील चाणक्य कोण? शरद पवार की देवेंद्र फडणवीस? कोणाचा डाव यशस्वी होणार?
अग्निपथचा निषेध करण्यासाठी पोहोचलेल्या कन्हैया कुमारला तरूण म्हणाले, देशद्रोही; झाली मारहाण