this way indian team reach in semi final | ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ मध्ये प्रत्येक संघाने ४-४ सामने खेळले आहेत. असे असतानाही एकाही संघाला उपांत्य फेरीचे तिकीट कापता आलेले नाही. २ नोव्हेंबरला भारताच्या विजयाने भारताचे सेमी फायनलमध्ये जाणे जवळपास निश्चित झाले होते. पण पाकिस्तानच्या सामन्यानंतर पुन्हा गोंधळ निर्माण झाला आहे.
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेतील सामना नुकताच पार पडला आहे. या सामन्यात पाकिस्ताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानने ३३ धावांनी पराभव केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या संघाचेही सेमी फायनलमध्ये जाण्याची शक्यता वाढली आहे.
आता पाकिस्ताचे सुद्धा ४ गुण झाले आहेत. त्यामुळे त्यांनी पुढच्या सामन्यात विजय मिळवला तर त्यांचेही ६ गुण होतील. सध्या आफ्रिकाकडे ५ गुण आहे तर भारत ६ गुणांसह टॉपवर आहे. अशात जर आफ्रिकेने पुढचा सामना जिंकला तर त्यांचे ७ गुण होतील. रनरेटचा विचार केला तर पाकिस्तान आणि आफ्रिका या दोन्ही संघाचा रनरेट भारतापेक्षा जास्त आहे.
अशात भारताला सेमी फायलनमध्ये जायचे असेल, तर पुढच्या सामन्यात झिम्बाब्वेला पराभूत करणे हाच एकमेव मार्ग भारतासाठी असणार आहे. भारताचा पुढचा सामना रविवारी आहे. रविवारी भारत झिम्बाब्वेला मैदानात भिडणार आहे. झिम्बाब्वेने सुद्धा टी २० वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
झिम्बाब्वेने भारताला पराभूत केले, तर भारतासाठीच तो मोठा धक्का असू शकतो. तसेच संपुर्ण समीकरणही बिघडू शकते. भारताचा पुढच्या सामन्यात पराभव झाला, तर भारताचे सहाच गुण राहतील. तसेच पाकिस्तान आणि आफ्रिकेने जर पुढील सामने जिंकले तर भारतीय संघाचा वर्ल्डकपमधून पत्ताकट होईल.
अशात ६ नोव्हेंबरला होणारा भारत-झिम्बाब्वेचा सामना भारतासाठी करो या मरोचा सामना असणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला तर भारतीय संघाची सेमी फायनलमधील जागा निश्चित होणार आहे. पण जर भारताचा पराभव झाला, तर भारताचं टेंशन वाढणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
Vaishali Suryavashi : खबरदार! यापुढे माझ्या वडीलांचा फोटो लावला तर…; शिंदेगटातील आमदारावर बहीण भडकली
Indian team : झिम्बाब्वेने भारताला हरवले, तर झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करणार; प्रसिद्ध अभिनेत्रीचे थेट चॅलेंज
Marathi Movie : माती खाल्ली! मराठी कलाकार नाही दिसले का? शिवरायांची भूमिका अक्षयकुमारला दिल्याने लोकं संतापले






