Share

Ramayana: रामानंद सागर यांना रामायण मालिका बनवण्यासाठी आला होता ‘एवढा’ खर्च, कमाईने मोडले होते रेकॉर्ड

Ramayana: टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत अनेक वेळा रामायण (Ramayan) बनले आहे, परंतु आजपर्यंत 1987 मध्ये प्रसारित झालेल्या रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ला कोणीही टक्कर देऊ शकले नाही. या रामायणात अरुण गोविल यांनी रामाची भूमिका साकारली आणि आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली. राम या व्यक्तिरेखेतील अरुण गोविल (Arun Govil) लोकांना इतका आवडला की अनेक वर्षांनंतरही लोक त्यांना रामच मानतात. Ramayana, Ramanand Sagar, TV Industry, Arun Govil

त्याचवेळी या रामायणात दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) सीतेच्या भूमिकेत तर अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi) रावणाच्या भूमिकेत दिसले होते. या सर्वांनी रामायणात इतका जबरदस्त अभिनय केला की आजही लोक या पात्रांना विसरलेले नाहीत. या लेखाद्वारे जाणून घ्या की या मालिकेचा एक भाग बनवण्यासाठी किती खर्च आलेला.

आज एखादी सीरियल बनवली तर एक एपिसोड बनवण्यासाठी करोडो रुपये लागतात. दुसरीकडे, जर एखाद्या धार्मिक मालिकेबद्दल असेल तर त्याचे बजेट आणखी वाढते, परंतु फायदा देखील तितकाच वाढतो. असा दावा केला जातो की त्या काळात रामायणाचा एक भाग बनवण्यासाठी सुमारे नऊ लाख रुपये खर्च केले जात होते.

त्याचवेळी, शोच्या एका एपिसोडमधून निर्मात्यांना सुमारे 40 लाखांची कमाई होत होती. त्याच वेळी, शोच्या संपूर्ण कमाईचा विचार केला तर तो 30 कोटींपेक्षा जास्त आहे. रामानंद सागर यांच्या समायरणचे 78 भाग प्रसारित झाले होते, जे 35 मिनिटांचे असायचे. ही मालिका सुरू झाली तेव्हा पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांनी त्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू केला.

ज्यावेळी रामायणाचे भाग प्रसारित व्हायचे तेव्हा रस्त्यावर शांतता पसरलेली असायची. भारताव्यतिरिक्त आणखी 55 देशांमध्ये रामायण प्रसारित झाले. चाहत्यांनी या शोवर भरभरून प्रेम केले. अनेकांनी त्या पात्रांना सत्य मानले तर अनेकांनी त्यांना आपल्या हृदयात स्थान दिले.

महत्वाच्या बातम्या-
बॅंकेत कॅशिअर म्हणून काम करायचे ACP प्रद्युम्न, रामायणातील ‘या’ एका पात्राने बदलले नशिब, वाचा यशोगाथा
PHOTO: रामायणमधील सीतेला शॉर्ट ड्रेसमध्ये पाहून संतापले लोक, म्हणाले, आम्ही तुम्हाला देवीचा दर्जा दिला आहे’
मुस्लिम विद्यार्थ्यांनी जिंकली चक्क रामायणावरील ऑनलाइन प्रश्नमंजुषा; सर्वत्र त्यांचीच चर्चा

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now