Share

हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचण्यासाठी ‘ही’ दोन औषधे नेहमी ठेवा सोबत; जाणून घ्या कशी घ्यायची

Heart pain

गेल्या काही वर्षात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. कधी कोणाला हृदयविकाराचा झटका येईल हे सांगता येत नाही? हृदयविकाराच्या झटक्यामुळे अनेकांचे तर मृत्यू सुद्धा झाले आहे. त्यामुळे सावध राहणे नेहमी गरजेचे आहे.

लोकांना चुकीच्या सवयी लागत आहे. त्यामुळे हृदयाचे विकार त्यांना होत आहे, असे अनेक डॉक्टरांनी सांगितले आहे. कोरोनानंतरच्या काळात हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. कमी वयात असताना सुद्धा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.

हृदयविकार असेल तर त्याचा त्रास कधीही होऊ शकतो. पण काळजी घेतली तर आपल्याला या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो.  या ऋतुमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असतो. त्यामुळे या ऋतुमध्ये तरी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. आता आम्ही तुम्हाला ती काळजी कशी घ्यायची याबद्दल सांगणार आहोत.

जेष्ठ फिजिशियन डॉ. अजय कुमार यांनी सांगितले की, मधुमेह, लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्या ज्यांना आहेत, त्यांचा याचा त्रास होण्याची जास्त शक्यता असते. या लोकांना हृदयविकार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे त्यांनी खास काळजी घेतली पाहिजे.

पुढे ते म्हणाले की, कोरोनानंतर हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. कारण कोरोना व्हायरसमुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होत आहे. त्यामुळे हृदयाला होणाऱ्या रक्त पुरवठ्यामध्ये अडचण निर्माण होते आणि याच कारणामुळे हृदयविकाराचा झटका येतो. ही समस्या फक्त जेष्ठ लोकांनाच नाही, तर तिशीतील तरुणांमध्येही पाहायला मिळाली आहे.

हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचवण्यासाठी दोन औषधे नेहमीसोबत ठेवली पाहिजे. ऍस्पिरिन आणि सॉर्बिट्रेट ५ ग्रॅम ही दोन औषधे तुम्ही नेहमी सोबत ठेवली पाहिजे. हृदयविकाराची लक्षणे दिसताच तुम्ही ती औषधे लगेच घेऊ शकतात, असे अजय कुमार यांनी सांगितले आहे.

ऍस्पिरिनची एक गोळी पाण्यात विरघळून रुग्णाला द्यावी आणि त्यानंतर सॉर्बिट्रेटची एक गोळी जीभेखाली ठेवावी. त्यानंतर लगेच रुग्णाला रुग्णालयात घेऊन जावे. ही औषधे काही काळासाठी हृदयात येणाऱ्या अडचणींना थांबवू शकतात. त्यामुळे रुग्णाला जर वेळेत रुग्णालात पोहचवले तर त्याचा जीव वाचवता येऊ शकतो, असे अजय कुमार यांनी सांगितले आहे.

छातीत अचानक तीक्ष्ण वेदना, विनाकारण घाम, श्वास घेण्यास अडचण होत असताना मळमळ आणि छातीत दुखणे, छातीत दुखत असताना ती वेदना डाव्या हातापर्यंत जाणे, अशी लक्षणे दिसत असेल तर काळजी घेणे गरजेचे आहे.

तसेच हृदयविकार होण्यापासून वाचण्यासाठी काही काळजी घेणे  गरजेचे आहे. तुमचे बिपी आणि साखरेची पातळी नियमितपणे तपासली पाहिजे, छातीत जास्त वेदना होत असतील डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, दर तीन महिन्यांनी लिपीड प्रोफाईल टेस्ट करायला हवी, स्ट्रीट फुड खाणे टाळले पाहिजे.

महत्वाच्या बातम्या-
द्रारिद्यात जन्मलेल्या धीरेंद्रशास्त्रींची संपत्ती किती आहे माहितीये का? महिन्याच्या कमाईचा आकडा ऐकून धक्का बसेल
‘हा’ प्रसिद्ध बाॅलीवूड अभिनेता साकारणार संभाजी महाराजांची भूमिका; नाव वाचून बसेल धक्का 
अथिया शेट्टी केएल राहूल झाले विवाहबद्ध; पहा दोघांच्या लग्नाचे सुंदर फोटो

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now