Hardik Pandya, Asia Cup, Virat Kohli, KL Rahul/ आशिया चषकाच्या (Asia Cup) पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघाने 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. सेट झाल्यानंतर सर्व दिग्गज एकामागून एक पॅव्हेलियनमध्ये परतत होते. अशा दडपणपूर्ण क्षणांमध्ये पंड्याने शानदार खेळी खेळली आणि 17 चेंडूत 33 धावा केल्या आणि दोन चेंडू राखून 147 धावांचे लक्ष्य गाठले. याआधीही हार्दिकने गोलंदाजीत चमत्कार केला होता.
तीन विकेट घेतल्यानंतर जोमाने फलंदाजी करणारा पंड्या हाच विजयाचा खरा हिरो ठरला. तो नसता तर कदाचित भारताला हा विजय मिळाला नसता. भारताचा माजी कर्णधार विराट जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा भारत संकटात सापडला होता. दुसऱ्याच चेंडूवर केएल राहुलची मोठी विकेट पडली. अशा स्थितीत संघाला मोठ्या भागीदारीची गरज होती.
कर्णधार रोहित शर्मासह त्याने संघाची धुराही सांभाळली. आता दोघेही क्रीजवर सेट झाले होते. भारत हळूहळू आपल्या लक्ष्याकडे वाटचाल करत होता. मात्र आधी रोहित शर्माने बेफिकीर शॉट खेळून फटकेबाजी केली, त्यानंतर विराट कोहलीनेही तीच चूक केली. भारत संकटात असताना विराटने खेळलेल्या या शॉटमुळे चाहते त्याच्यावर प्रचंड नाराज झाले आहे.
खरतर, दहावे षटक टाकण्यासाठी आलेल्या फिरकीपटू मोहम्मद नवाजच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात विराटने आपली विकेट गमावली. तो पाऊल टाकून इनसाईड आऊट ड्राईव्ह घेणार होता. लेन्थमुळे चेंडू मधल्या स्टंपवर टाकता आला नाही आणि चेंडू थेट लाँग ऑफ क्षेत्ररक्षक इफ्तिखारच्या हातात गेला. 34 चेंडूत 35 धावांची खेळी संपली. त्याला फॉर्ममध्ये येण्याची यापेक्षा चांगली संधी नव्हती.
त्याचा खराब फॉर्म केवळ चाहत्यांसाठीच नाही तर किंग कोहलीसाठीही चिंतेची बाब आहे. फॉर्म परत येण्यासाठी कोहलीने क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेतली होती. तो भारतीय संघासोबत झिम्बाबे आणि वेस्ट इंडिज दौर्यावर गेला नव्हता. विराट पूर्वीसारखा फॉर्ममध्ये कधी येईल याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागले आहे.
भुवनेश्वरने चार षटकांत 26 धावा देऊन चार बळी घेतले, ज्यात पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम (10) याच्या बहुमोल विकेटचा समावेश होता, तर हार्दिकने चार षटकांत 25 धावा देत तीन बळी घेत पाकिस्तानी मधल्या फळीचे कंबरडे मोडले. युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने 33 धावांत दोन बळी घेतले. भारत-पाकिस्तान सामन्यात खेळण्याचा अर्शदीपचा हा पहिलाच अनुभव होता.
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहलीचा बचाव करत सुनील गावसकरांनी कपिल देवलाही दिले चोख प्रत्युत्तर, म्हणाले…
विराट कोहलीनंतर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर फिदा झाली ही महिला क्रिकेटर, म्हणाली…
गेल्या पाच-सहा वर्षात विराट कोहलीशिवाय भारत.., कपिल देव यांचे पुन्हा एकदा मोठे वक्तव्य