Share

‘हा’ स्टार वेगवान गोलंदाज वाचवणार टीम इंडियाची इज्जत; पुढच्या सामन्यात संधी नक्की मिळणार

ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखाली टीम इंडियाला (Team India) दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. सलग दुसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने (South Africa) २-० अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियासाठी पुढचा सामना करा किंवा मरा सारखा असेल, अशा परिस्थितीत संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल होऊ शकतात.(Arshdeep Singh, Rishabh Pant, Team India, South Africa)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-२० सामना १४ जून रोजी होणार आहे. या सामन्यात ऋषभ पंत एका युवा वेगवान गोलंदाजाला संधी देऊ शकतो जो टीम इंडियाच्या बुडत्या नावेला वाचवू शकतो, हा युवा वेगवान गोलंदाज दुसरा कोणी नसून अर्शदीप सिंग आहे. IPL २०२२ मध्ये अर्शदीप सिंग मोठ-मोठ्या फलंदाजांवर भारी पडला होता, तो टीम इंडियामध्ये पहिल्या संधीची वाट पाहत आहे.

टीम इंडियासमोर तिसऱ्या टी-२० मध्ये सीरीज वाचवण्याचे आव्हान असेल. हे आव्हान पेलण्यासाठी ऋषभ पंत अर्शदीप सिंगला संघात पदार्पणाची संधी देऊ शकतो. अर्शदीप शेवटच्या ओवरमध्ये अत्यंत घातक गोलंदाज असल्याचे सिद्ध झाले आणि अचूक यॉर्कर्स हे त्याचे मोठे हत्यार आहे. हा खेळाडू आगामी सामन्यांमध्ये संघासाठी मोठा मॅचविनर ठरू शकतो.

आतापर्यंत खेळलेल्या २ टी-२० सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमार वगळता एकाही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे पुढील सामन्यात अर्शदीप सिंग संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे. आयपीएल २०२२ मध्ये, त्याने जसप्रीत बुमराहपेक्षा अधिक यॉर्कर गोलंदाजी केली आणि १४ सामने खेळले आणि ७.७० च्या इकॉनॉमीने १० बळी घेतले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, माजी क्रिकेटर इरफान पठाणने अर्शदीप सिंगने पाचही टी-२० सामन्यांमध्ये खेळायला हवे, असा सल्ला दिला होता. तो म्हणाला होता की, अर्शदीप सिंगला आयपीएलमध्ये अपेक्षेपेक्षा कमी विकेट मिळाल्या. त्याने १४ सामन्यात फक्त १० विकेट घेतल्या पण मोठ्या फलंदाजांना आऊट करण्याची क्षमता त्याच्यात आहे. तो महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्यासारखे धुरंधर हीटर्सलाही शांत करतो. माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर टाकण्याच्या अर्शदीपच्या क्षमतेचे कौतुक केले.

महत्वाच्या बातम्या-
VIDEO: हा तर रडीचा डाव; रबाडाने ऋषभ पंतला मारला कोपर, रस्ताही अडवला, कोसळला पंत
दीपक चाहरच्या रिसेप्शन पार्टीत हा खेळाडू ठरला चर्चेचा विषय, नेटकऱ्यांनी घेतली फिरकी, म्हणाले.. 

क्रिकेटच्या सरावासाठी आईने रोज १३ किमी सायकल चालवली, आता मुलगा भारताकडून खेळणार 
दीपक चाहरच्या रिसेप्शन पार्टीत हा खेळाडू ठरला चर्चेचा विषय, नेटकऱ्यांनी घेतली फिरकी, म्हणाले..

 

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now