Shares, Tata Motors, Stock/ तुम्हीही अनेकदा शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, तुम्ही टाटा समूहाची प्रमुख कंपनी टाटा मोटर्सच्या (Tata Motors) स्टॉकवर लक्ष ठेवू शकता. टाटा मोटर्सचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्लाही तज्ञ देत आहेत. जागतिक ब्रोकरेज जेफरीज (Jefferies) या स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्याबाबत उत्सुक आहे.
जेफरीज ते खरेदी करण्याची शिफारस करतात. टाटा मोटर्सच्या शेअर्सला जेफरीजने ‘बाय’ रेटिंग दिले आहे. सोमवारी बंद झालेल्या ट्रेडिंग सत्रात टाटा मोटर्सचा शेअर 397.50 रुपयांवर बंद झाला. ब्रोकरेज कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक वाहन (EV) ची अग्रगण्य ऑटो निर्मात्या टाटा मोटर्सवर जोरदार मोर्चा वळवला आहे.
कंपनीने इलेक्ट्रिक कारचे अनेक सेगमेंट सादर केले आहेत. कंपनीने त्याच्या बेस व्हेरिएंट Tiago ev चे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील सादर केले आहे. इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये लॉन्च करण्यात आलेली कंपनीची ही पहिली हॅचबॅक कार आहे. एकूणच टाटाची ही तिसरी इलेक्ट्रॉनिक कार आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ब्रोकरेज कंपन्यांनी टाटा मोटर्सला 540 रुपयांची लक्ष्य किंमत दिली आहे. टाटा 165 शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची उपलब्धता वाढवत आहे. टाटा मोटर्सने पहिल्या 10,000 ग्राहकांसाठी 8.49 लाख रुपयांच्या किमतीत Tiago EV लाँच केले आहे.
टाटा मोटर्सचा शेअर सध्या 400 रुपयांच्या पातळीवर चालू आहे. सोमवारी बंद झालेल्या सत्रात तो 397.50 रुपयांवर बंद झाला. यादरम्यान त्याने 405 रुपयांचा उच्चांक गाठला. या समभागाचा 52 आठवड्यांचा उच्चांक 536.70 रुपये आहे. तर 52 आठवड्यांचा नीचांक 335 रुपये आहे. 1.42 लाख कोटी भांडवल असलेल्या या कंपनीच्या समभागाबद्दल तज्ज्ञांमध्ये उत्साह आहे.
महत्वाच्या बातम्या-
Aditya Thackeray : आनंद दिघेंच्या जुन्या आठवणींना आदित्य ठाकरेंनी दिला उजाळा, ‘तो’ खास फोटो केला शेअर
Mahesh Babu: महेश बाबूच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं, आईचे झाले निधन, चाहत्यांनी ‘तो’ जुना व्हिडीओ केला शेअर
IAS अधिकाऱ्याने शेअर केला अमिताभ यांचा ‘तो’ जुना व्हिडीओ, कॅप्शनमध्ये लिहीलं, ‘कोण मोठं आहे?’