आज महाराष्ट्र्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी विरोधकांचा धुरळा उडवला आहे. या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर रोहित पाटील यांनी निवडणुकीपूर्वी केलेलं हे विधान तंतोतंत खरं ठरवलं आहे.
या निवडणुकीचा प्रचार सुरु असताना रोहित पाटील यांनी भाषणात केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारसभेची सांगता रोहित पाटील यांच्या भाषणाने झाली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रचारसभेला उपस्थित होते. या भाषणात रोहित पाटील यांनी आपल्या वडिलांची आठवण काढली होती.
“आमच्या मनातील पॅनल निवडलंय असं सर्वसामन्यांचं मत आहे. सर्वसामान्य माणसाने राष्ट्रवादीला खांद्यावर घेतलं आहे. या निवडणुकीचा निकाल १९ जानेवारीला येणार आहे. निकाल लागल्यानंतर माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.” असे रोहित पवार भाषणात म्हणाले होते. हे विधान कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर खरं ठरलं आहे.
रोहित पाटील प्रतिक्रिया देताना म्हणाले की, निवडणुकीत विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं, माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.” कवठेमहाकांळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत रंगतदार लढत पाहायला मिळाली होती.
कवळेमहाकांळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने १० जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली आहे. विरोधकांना फक्त ६ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत रोहित पाटील यांच्या विरोधात तासगाव- कवठेमहांकाळ तालुक्यातील सगळे बडे नेते एकवटले होते. पण या निवडणुकीत रोहित पाटील यांनी नेतृत्त्व करत विजय मिळला आहे.
आज मला निश्चितच आबांची आठवण येतेय. या विजयचा सगळ्यात जास्त आनंद आबांशिवाय दुसऱ्या कुणालाच झाला नसता”, असे रोहीत पाटील आर आर आबांची आठवण काढताना म्हणाले. आपला विजय हा लोकांमुळेच शक्य झाला असून या विजयाचं श्रेयदेखील रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ मधील जनतेला दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
बच्चू भाऊंचा ‘प्रहार’, मोताळा आणि संग्रामपूर नगरपंचायत जिंकली, भाजपला भोपळा
प्रत्येक मंदिरात घंटा का असते? घंटेचा आवाज ऐकल्याने आपल्या मेंदूवर त्याचा काय परिणाम होतो?
रिअॅलिटी शोमध्ये मोदींची खिल्ली उडवल्याने सरकार संतापेल; मीडिया हाऊसला पाठवली नोटीस