Share

RCB च्या ‘या’ तीन खेळाडूंनी केल्या सर्व अपेक्षा भंग, संघाने कोट्यवधी रुपये देऊन केले होते रिटेन

शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात कोण आयपीएलच्या फायनलला जाणार हे ठरणार होते. पण क्वालिफायरचा सामना हरल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध ७ विकेट्सनी पराभव पत्करावा लागल्यानंतर बेंगलोरचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे. या संघाला १५ वर्षांनंतरही पहिले विजेतेपद मिळवता आलेले नाही. (this rcb player fail in this ipl season)

आयपीएलच्या या सिजनपूर्वी, आरसीबीच्या संघाला ३ खेळाडूंकडून खूप अपेक्षा होत्या. त्यामुळे संघाने त्यांना आत्मविश्वासाने कायम ठेवले होते. ज्यामध्ये विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांचे नाव होते. या दिवसांत आरसीबीला या तिन्ही खेळाडूंकडून खुप अपेक्षा होत्या.

आरसीबीचा संघ या सिजनमध्ये पहिल्या विजेतेपदाची वाट पाहत होता, परंतु यावेळीही त्यांचे स्वप्न स्वप्नच राहिले. आरसीबीचे हे स्वप्न भंग करण्याचे काम त्यांनीच रिटेन केलेल्या खेळाडूने केले आहे. ते कोणते खेळाडू होते हे आपण जाणून घेणार आहोत.

विराट कोहली– रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांचा सर्वाच आवडता खेळाडू बनलेला विराट कोहली पुन्हा एकदा या संघासोबत दिसला. त्याला आरसीबीने १५ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. अशा परिस्थितीत यंदाच्या सिजनमध्ये त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. विराट कोहलीने या सिजनमध्ये कर्णधारपदाचे दडपण संपवले होते. मात्र त्याने संघाला पुन्हा निराश केले आहे.

या सिजनमध्ये विराट कोहली धावा काढण्यासाठी खूप संघर्ष करताना दिसला. विराट कोहलीने या सिजनमध्ये खेळल्या गेलेल्या १६ सामन्यांमध्ये फक्त २ अर्धशतके खेळली, त्यामुळे ११७ च्या स्ट्राइक रेटने तो केवळ ३४१ धावा करू शकला. कोहलीच्या अपयशाने आरसीबीला पुन्हा विजेतेपदापासून दूर ठेवले.

ग्लेन मॅक्सवेल– आयपीएलच्या १५ व्या सिजनसाठी लिलावापूर्वी आरसीबीने ग्लेन मॅक्सवेलला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मॅक्सवेलला आरसीबीने ११ कोटींची रक्कम देऊन कायम ठेवले. मॅक्सवेल संघासाठी यंदाच्या सिजनमध्ये चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. पण यंदा त्यालाही काही कमाल करता आली नाही.

ग्लेन मॅक्सवेलबद्दल सांगायचे तर, त्याने या सिजनमध्ये नक्कीच काही चांगल्या खेळी खेळल्या, परंतु चांगल्या सुरुवातीनंतर तो बहुतेक विकेट गमावत राहिला. या सिजनमध्ये पहिल्या ३ सामन्यांनंतर मॅक्सवेल सतत खेळला, पण त्याला १३ सामन्यांत ३०१ धावाच करता आल्या.

मोहम्मद सिराज– रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आयपीएलच्या या सिजनमध्ये युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांसारख्या गोलंदाजांकडे दुर्लक्ष करून मोहम्मद सिराजला कायम ठेवले. मोहम्मद सिराजला आरसीबीने ७ कोटी देऊन कायम ठेवले. आरसीबीला सिराजकडून खूप आशा होत्या.

मोहम्मद सिराजने या सिजनमध्ये आरसीबी फ्रँचायझीची खूप निराशा केली. सिराजला या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने १५ सामन्यांमध्ये फक्त ९ विकेट्स घेतल्या. सिराजच्या खराब गोलंदाजीने आरसीबीचा काही फायदा होऊ शकला नाही.

महत्वाच्या बातम्या-
सावधान! कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ, पुन्हा निर्बंध लागणार? मुंबईच्या पालकमंत्र्यांनी दिला ‘हा’ इशारा
IPL मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कार्तिकमुळेच RCB चे ट्रॉफीचे स्वप्न भंगले, ‘ती’ एक चूक अन् गमावला सामना
७ धावा करून बाद झाला पण जाता जाता चाहत्यांचं जिंकलं मन, विराट कोहलीचा तो व्हिडिओ व्हायरल

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now