भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याने अनेक युवा खेळाडूंचे करिअर घडवले आहे. सध्याचा भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) एकेकाळी संघात स्थान मिळवण्यासाठी झगडत होता. वनडेत त्याची फलंदाजीची सरासरी ३० पेक्षा कमी होती. यानंतर धोनीने रोहितला ओपनिंगमध्ये खेळण्याची संधी दिली आणि आज रोहितची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते.(Hardik Pandya, MS Dhoni, Career, Rohit Sharma)
विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांसारख्या खेळाडूंच्या बाबतीतही असेच आहे. २०१५ च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी धमाकेदार कामगिरी करून हार्दिक पांड्याला २०१६ मध्ये भारतीय संघात स्थान मिळाले. ऑस्ट्रेलियातील पदार्पणाच्या सामन्यात हार्दिकने पहिल्याच ओवरमध्ये २१ धावा दिल्या होत्या.
त्या सीरीजची आठवण करून देताना हार्दिक पांड्या म्हणाला, ‘जेव्हा मी भारतीय संघात सामील झालो, तेव्हा मी त्या लोकांना पाहिले ज्या लोकांना मी यशस्वी होताना पाहिले होते. ज्यामध्ये सुरेश रैना, हरभजन सिंग, युवराज सिंग, एमएस धोनी, विराट कोहली, आशिष नेहरा यांचा समावेश आहे.
मी भारतासाठी खेळण्यापूर्वी ते मोठे स्टार होते. त्यांच्यामध्ये खेळणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, त्यामुळे साहजिकच मी ज्या पद्धतीने सुरुवात केली, मला वाटते की पहिल्या षटकात २१ धावा देणारा मी पहिला क्रिकेटर आहे. यानंतरही महेंद्रसिंग धोनीने त्याला गोलंदाजी दिली. पुढील दोन षटकांत हार्दिकने १६ धावांत २ फलंदाज बाद केले.
हार्दिक पुढे म्हणाला, ‘मला खरोखरच वाटले की हे माझे शेवटचे षटक असू शकते. पण माही भाईच्या नेतृत्वाखाली खेळणे माझ्यासाठी खूप आशीर्वाद आणि भाग्यवान आहे, ज्याने आमच्यावर खूप विश्वास दाखवला ज्यामुळे आम्हाला या टप्प्यावर पोहोचण्यास मदत झाली. त्याच वर्षी टी-२० विश्वचषक होणार होता.
ऑस्ट्रेलिया मालिकेत हार्दिक पांड्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. यानंतरही धोनीने त्याला टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची हमी दिली होती. हार्दिक म्हणाला, ‘माझ्या तिसर्या सामन्यानंतर माही भाईने मला सांगितले की, तू विश्वचषक संघात असणार. त्या सामन्यांमध्ये मी फलंदाजीही केली नव्हती, पण त्यांनी मला आश्वासन दिले होते की, तू स्वतःला सिद्ध केले आहे, आणि आज ते एक स्वप्न सत्यात उतरले आहे.
महत्वाच्या बातम्या-
लिलावात अनसोल्ड राहिला होता हा खेळाडू, हार्दिक पांड्याने दाखवला विश्वास अन् गाजवले मैदान
दिनेश कार्तिकसोबत हार्दिक पांड्याने निभावली मैत्री, स्वता कार्तिकने केले कौतुक, म्हणाला
धोनीने संघातून वगळल्यानंतर मी निवृत्ती घेणार होतो पण.., वीरेंद्र सेहवागचे खळबळजनक वक्तव्य
तर टीम इंडियामध्ये माझी निवड कधीच झाली नसती, धोनीचे मोठे वक्तव्य, चाहतेही झाले भावूक