Share

Team India: टीम इंडियाच्या विजयातही ‘हा’ खेळाडू ठरला सर्वात मोठा खलनायक, वर्ल्ड कपमधून होणार पत्ता कट?

Team India, World Cup, Deepak Chahar, Arshdeep Singh, Harshal Patel/ टीम इंडियाने दुसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. हा सामना पूर्णपणे फलंदाजांच्या नावावर होता जिथे सामन्यात एकूण 458 धावा झाल्या आणि फक्त सहा विकेट पडल्या. टीम इंडियाने भलेही या सामन्यात रोमहर्षक विजयाची नोंद केली असेल, पण या सामन्यात संघाचा एक खेळाडू मोठा खलनायक ठरला.

या खेळाडूचा टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या संघातही समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात दीपक चहर, अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेल यांचा वेगवान गोलंदाज म्हणून समावेश केला होता. या सामन्यात अर्शदीप सिंग टीम इंडियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 2 बळी घेतले.

या सामन्यात दीपक चहर हा सर्वात किफायतशीर गोलंदाज होता, चहरने 6.00 च्या इकॉनॉमीमध्ये केवळ 24 धावा दिल्या, परंतु हर्षल पटेलला ना धावा वाचवता आल्या आणि ना विकेट मिळवता आल्या. हर्षल पटेल हा काही काळापासून महागात पडत आहे. हर्षल पटेल नुकताच दुखापतीतून बरा झाला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 मालिकेत तो परतला.

स्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत हर्षल पटेल पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात तो पुन्हा एकदा महागडा ठरला. या सामन्यात 4 षटके गोलंदाजी करताना त्याने 11.25 च्या इकॉनॉमीने 45 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात 237 धावांची मोठी धावसंख्या उभारली. टीम इंडियासाठी सूर्यकुमारने 22 चेंडूत 61 धावांच्या खेळीत पाच षटकार आणि तब्बल चौकार मारले. त्याने 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, जे भारतासाठी दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे.

या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना डेव्हिड मिलर आणि क्विंटन डी कॉक (नाबाद 69) यांच्यातील चौथ्या विकेटसाठी 90 चेंडूत 174 धावांची अखंड भागीदारी करूनही आफ्रिकेच्या संघाला तीन गड्यांच्या मोबदल्यात 221 धावा करता आल्या.

महत्वाच्या बातम्या-
आज लग्नबेडीत अडकणार टीम इंडियाचा ‘हा’ स्टार खेळाडू; धोनी, कोहली, रोहित तुफान नाचणार
टीम इंडियाच्या निवडीवर काँग्रेस नेत्याने उपस्थित केले प्रश्न, संतापून घेतला ‘हा’ मोठा निर्णय
अखेर तो दिवस आलाच! दिनेश कार्तिकला मिळाले टीम इंडियाचे टी-20 कर्णधारपद, हार्दिक पंड्याला डच्चू

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now