shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना पक्षात मोठी फूट पडल्यानंतर शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थक यांच्यात रोजच वाद – प्रतिवाद पाहायला मिळतात. मात्र बंड केल्यावर सुरुवातीच्या काळात उद्धव ठाकरेंबद्दल एकही अपशब्द उच्चारणार नाही, असं म्हणणारे शिंदे गटातील आमदार, खासदार आता मातोश्री आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत आहेत.
शिवसेनेचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. बुलढाण्यातील हिंदू गर्वगर्जना कार्यक्रमाला उपस्थित असताना ते म्हणाले, ‘५० खोके एकदम ओक्के’ नव्हे तर ‘१०० खोके मातोश्री ओक्के ते पण दर महिन्याला’ असे वक्तव्य त्यांनी केले. पुढे ते म्हणाले, सचिन वाझे दर महिन्याला मातोश्रीवर १०० कोटी पाठवत होता.
या गंभीर आरोपामुळे दसरा मेळाव्याच्या तोंडावर उद्धव ठाकरे समर्थक आणि शिंदे गटात मोठा राजकीय आखाडा रंगणार असल्याचे दिसते. बुलढाण्याचे पालकमंत्री झालेले गुलाबराव पाटील यांचे बुलढण्यामध्ये मोठ्या धुमधडाक्यात रॅली काढत स्वागत करण्यात आले. त्यानंतर झालेल्या हिंदू गर्वगर्जना कार्यक्रमादरम्यान प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला.
कार्यक्रमात पुढे ते म्हणाले, ‘कार्यकर्त्यांच्या वाळूच्या गाड्या पकडल्या गेल्या. पत्त्यांच्या क्लबवर रेड पडली तर आम्हाला फोन करावा लागतो. आदित्य ठाकरे कधी कोर्टाची पायरी चढली आहेत का?’ असा थेट सवालच त्यांनी यावेळी केला. प्रतापराव जाधव यांच्या या घनाघाती आरोपामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे.
खासदार प्रतापराव जाधव जुलैमध्ये शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. शिवसेना पक्षाने त्यांना जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हटवले. त्याबाबतचे प्रसिध्दी पत्रक थेट सामनामध्ये छापून आले होते. प्रतापराव जाधव यांनी शिवसेनेवर आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे.
दसरा मेळाव्यात प्रतापराव जाधव यांच्या गंभीर आरोपाला शिवसेनेकडून कोणते प्रत्युत्तर मिळते? हे आता पहावे लागेल. मात्र आत्ता ‘५० खोके एकदम ओक्के!’ म्हणणाऱ्या ठाकरे समर्थकांना प्रतापराव जाधव यांनी ‘१०० खोके मातोश्री ओक्के!’ म्हणत टोला लगावल्याचे दिसते.
महत्वाच्या बातम्या-
rohit pawar : अमोल कोल्हे शहांच्या भेटीला तर पवारांचा ‘जय श्रीराम ‘चा नारा; वाचा नेमकं राष्ट्रवादीत घडतंय काय?
shivsena : ‘शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा तडीपार करून एन्काऊंटर,’ पोलीस उपायुक्ताची शिवसेना नेत्याला धमकी
shinde group : शिंदे गटात प्रवेश करण्याबाबतच्या चर्चेदरम्यान मिलिंद नार्वेकरांचं सूचक ट्विट; म्हणाले, “मी भाग्यवान आहे की…”