Share

‘या’ व्यक्तीमुळे झाला लतादीदींना कोरोना, घरातीलच व्यक्ती निघाली कोरोना पॉझिटिव्ह

Lata Mangeshkar Health Condition Is Critical

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अशा परिस्थितीत भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्या ९२ वर्षांच्या आहेत. त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. मात्र खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लतादीदींचे वय जास्त असल्यामुळे त्या घराबाहेर शक्यतो पडत नाहीत. लतादीदींची कुटुंबियांकडून खूप काळजी घेतली जाते. परंतु इतकी काळजी घेतली जात असताना देखील लता दीदींना करोनाचा संसर्ग कसा झाला, हा प्रश्न सर्वानाच पडला आहे.

या प्रश्नाचे उत्तर सध्या मिळालं असून ज्येष्ठ गायिका लता मंगेशकरांच्या घरी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. लतादीदींच्या घरी काम करणारा हा कर्मचारी दैनंदिन गोष्टी आणण्यासाठी सतत घराबाहेर पडायचा. तो कर्मचारी लतादीदींच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात आले आहे.

ज्येष्ठ गायक अनुप जलोटा यांनी लतादीदींच्या प्रकृतीबद्दल काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. “आजकाल त्या कुणालाही भेटत नाहीत. त्यांना लवकर इन्फेक्शन होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी भेटीगाठी बंद केल्या होत्या. त्या त्यांच्या खोलीतच असतात. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथं डॉक्टर योग्य प्रकारे त्यांच्यावर उपचार करू शकतात, त्यांची काळजी घेऊ शकतात.”, असे अनुप जलोटा यांनी सांगितले आहे.

२०१९ मध्ये लतादीदींना न्युमोनियाची लागण झाली होती. त्यावेळी त्या २८ दिवस रुग्णालयात होत्या. लतादीदींना हृदयाशी निगडीत त्रास जाणवत होता. छातीत संसर्ग झाल्यामुळं त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे काहीदिवस लतादीदींना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

२०१८ मध्ये ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी तब्येत बरी नसल्यामुळे त्यांचा वाढदिवस रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. लतादीदींच्या वाढदिवसासाठी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण प्रकृती योग्य नसल्यामुळे त्यांनी कार्यक्रमाला न जाण्याचा निर्यण घेतला होता. भारतरत्न ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच सगळेजण त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
होम लोनऐवजी भाड्याच्या घरात राहा आणि EMI च्या पैशांनी घ्या २-३ घरे, जाणून घ्या कसे
स्वत:चं घर घेत असाल तर थांबा! भाड्याच्या घरात राहा आणि अशाप्रकारे घ्या २-३ घरे
“दुकानांच्या पाट्याच नाही, पाट्यांच्या आतला दुकानदारपण मराठी माणूस होऊ शकेल असे काहीतरी करा”

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now