पुण्यातील डॉ. सतीश चव्हाण यांचा चार वर्षाचा मुलगा स्वर्णव उर्फ डुग्गु ११ जानेवारीला बालेवाडी परिसरातून बेपत्ता झाला होता. डुग्गूचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या आई वडिलांनी चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात केली होती. अखेर आज स्वर्णव पुणे पोलिसांना वाकड जवळील पुनावळे येथील इमारतीत सापडला. पुणे पोलिसांना स्वर्णव सापडल्याची माहिती देणारा देवदूत समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळ्यातील लोटस पब्लिक स्कूलच्या जवळ एक इमारत आहे. तिथे स्वर्णवला आरोपीने सोडले. त्याच्या बॅगेत एक चिठ्ठी ठेवली होती. त्या चिठीवर डुग्गूच्या वडिलांचा फोन नंबर होता. त्या इमारतीच्या सुरक्षारक्षकाने डुग्गूला पाहिले. त्यांचे नाव दादाराव जाधव. त्यांनी डुग्गूच्या बॅगेत असलेल्या चिठ्ठीवरील नंबरवर व्हिडिओ कॉल केला आणि मुलगा त्यांचा आहे का याची खात्री करून घेतली.
डुग्गु मिळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस त्या इमारतीत आले. डुग्गूचे आई वडील सुद्धा त्या ठिकाणी आले. या घटनेची सर्व माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली आहे. “अपहरण झालेला मुलगा सुखरूप मिळाला आहे, या प्रकरणाचा तपास सुरु आहे, लवकरच आम्ही आरोपीपर्यंतही पोहोचू” असे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं आहे.
मागील 8 दिवसापासून आम्ही मुलाचा शोध घेत होतो. पोलिसांची अनेक पथके दिवस रात्र काम करीत होती. आज दुपारी मुलगा पुनावले येथे मिळाला. तो सुखरूप असून त्याला पालकांकडे सुपुर्द केले आहे.” असे पोलिस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितले आहे. अखेर आज स्वर्णव पुणे पोलिसांना सापडल्यामुळे त्याच्या आई वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. अखेर देवानेही डुग्गुच्या आई वडिलांची आर्त हाक ऐकली आणि तो पोलिसांना मिळाला.
अखेर आठ दिवसांनंतर डुग्गु त्यांच्या आई वडिलांना मिळाला आहे. डुग्गुला पाहताच त्याच्या आईला खूप आनंद झाला. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. डुग्गूच्या आई वडिलांनी या प्रकरणी पुणे पोलिसांचे आभार मानले आहेत. डुग्गूच्या आई वडिलांचे भेटीचे फोटो व्हायरल होत आहे.
मंगळवारी (ता.११) सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास बाणेर येथील हाय स्ट्रीट रस्त्यावरील इंदू पार्क सोसायटीजवळील उद्यानाजवळून स्वर्णव ऊर्फ डुग्गु सतीश चव्हाण (वय ४ वर्षे ) यास एक मुलगा “डे केअर’ला सोडविण्यासाठी पायी घेऊन जात होता. त्यावेळी आलेल्या एका व्यक्तीने मोठ्या मुलाच्या हाताला झटका देऊन स्वर्णवला गाडीवरुन उचलून नेत त्याचे अपहरण केले होते.
महत्वाच्या बातम्या :-
निलेश लंकेंना पारनेरकरांचा दे धक्का! नगर पंचायतीत बहूमत मिळण्यापासून रोखले
‘मुलगी झाली हो’ मालिकेत किरण मानेंची जागा घेणार ‘हा’ अभिनेता
पंकजा मुंडेचा धनंजय मुंडेंना जोरदार धक्का! संपुर्ण जिल्ह्यात भाजपचा दबदबा, राष्ट्रवादीचा दारूण पराभव