Share

VIDEO: पार्टीत वारंवार करत होता चुकीचा स्पर्श, सोनाली फोगाट मृत्यु प्रकरणात ‘या’ व्यक्तीला अटक

Sonali Phogat (1)

Sonali Phogat, Video, Suspect/ भाजप नेते आणि टिकटॉक स्टारच्या मृत्यूबाबतचा सस्पेंस अधिकच गडद होत असून कुटुंबीयांनी हत्येचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हाही दाखल केला आहे, मात्र आता सोनाली फोगटवरही हत्येपूर्वी बलात्कार झाल्याचा संशय असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. सोनाली फोगटला गोव्यात घेऊन जाणे हाही कटाचा एक भाग असल्याचे सोनाली फोगटच्या कुटुंबीयांनी सांगितले.

सोनालीचा भाऊ रिंकूने सांगितले की, गोव्यात 24 ऑगस्टला शूटिंगची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र हॉटेलमधील रूम 21 आणि 22 ऑगस्टसाठी बुक करण्यात आल्या होत्या. सोनाली फोगटला 22 ऑगस्ट रोजीच उत्तर गोव्यातील सेंट अँथनी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे तिला मृत घोषित करण्यात आले.

सोनाली फोगटच्या मृत्यूचे गूढ अधिकच गुंतागुंतीचे होत आहे. ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोवा पोलिसांनी सोनाली फोगट हत्येप्रकरणी दोघांना अटक केली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन लोक सोनाली फोगटला जबरदस्तीने डान्स करायला लावताना दिसत आहेत. त्यापैकी एक सोनाली फोगटचा पीए असल्याचे बोलले जात आहे.

सुधीर सांगवान असे सोनाली फोगटच्या पीएचे नाव आहे, तर त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती सुखविंदर आहे. जो पीएचा मित्र असल्याचे सांगितले जाते. हे दोघे नृत्य करताना सोनाली फोगटला विचित्र पद्धतीने स्पर्श करताना दिसतात. तर सोनाली फोगट मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांना गोवा पोलिसांनी हत्येप्रकरणी अटक केली आहे.

हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सध्या सोनाली फोगटचे पार्थिव दिल्लीत पोहोचले असून आता तिच्या हिसार येथील घरी नेण्यात येत आहे. सोनालीचा भाऊ रिंकू म्हणाला, आम्हाला नेहमीच वाटायचे काहीतरी चूकतय. आतापर्यंत या प्रकरणाच्या तपासावर आम्ही समाधानी आहोत. आम्ही न्यायाची मागणी करत आहोत. सोनालीच्या अंत्यसंस्कारानंतर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करायची की नाही याचा निर्णय कुटुंबीय घेतील.

सोनाली फोगटच्या मृत्यूप्रकरणी तिचे स्वतःचे दोन सहकारी प्रमुख संशयित मानले जात आहेत. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. सोनालीच्या भावाचे म्हणणे आहे की, 3 वर्षांपूर्वी त्याच्या बहिणीचे लैंगिक शोषण झाले होते. तिच्या जेवणात कोणीतरी अमली पदार्थ मिसळले होते आणि नंतर ती बेशुद्धावस्थेत असताना ही घटना घडली. तेव्हापासून सोनाली फोगटला ब्लॅकमेल केले जात होते.

टिकटॉक स्टारच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की सोनालीला तिच्या दोन सहकाऱ्यांनी कर्लीज हॉटेलमध्ये जेवायला नेले होते. तिला सांगण्यात आले की या रेस्टॉरंटमध्ये एक हरियाणवी व्यक्ती काम करत आहे, ज्याला तिला भेटायचे आहे. रेस्टॉरंटचे मालक एडविन नुनेस यांनीही सोनाली फोगट डिनरसाठी आल्याची पुष्टी केली आहे. सोनाली फक्त तिच्या दोन सहकाऱ्यांसोबत आली होती, पण कोणीही कर्मचारी तिला ओळखत नसल्याचे त्यांनी सांगितले.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सोनाली फोगटच्या शरीरावर जखमेच्या अनेक खुणा आढळून आल्या आहेत. सध्या तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. हिस्टोपॅथॉलॉजी आणि सेरोलॉजिकल अहवाल राखून ठेवले आहेत.

सोनाली फोगटचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे, परंतु कुटुंबीयांचे म्हणणे आहे की ती निरोगी आणि तंदुरुस्त आहे. त्यामुळे तिला हृदयविकाराचा झटका येऊ शकत नाही. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, मृत्यूच्या एक दिवस आधी त्यांच्यात फोनवर काही प्रॉब्लेमबद्दल बोलणे झाले होते. एवढेच नाही तर सोनालीच्या मृत्यूनंतर तिच्या हरियाणातील फार्म हाऊसमधून काही वस्तू चोरीला गेल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या-
Sonali Phogat: मृत्युच्या काही तासांपुर्वीच सोनाली फोगाटने शेअर केला होता ‘हा’ व्हिडीओ, तिला यातून काय दाखवायचे होते?
Sonali Phogat: सोनाली फोगट यांच्या भावाचा गंभीर आरोप, म्हणाले, माझ्या बहिणीवर बलात्कार करुन..
Sonali Phogat: सोनाली फोगट यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा, शरीरावर जबरदस्तीने…

ताज्या बातम्या क्राईम मनोरंजन

Join WhatsApp

Join Now