Share

मासे खाणाऱ्यांनो ही बातमी तुमच्यासाठी! माशांमध्ये सापडले प्लास्टिक; काळजी घ्या नाहीतर होतील ‘हे’ आजार

फिश

ही बातमी आहे मासे खव्वयांना सावध करणारी. आपण सगळेजण अतिशय चवीने मासे खातो. मात्र हेच मासे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. या माशांमुळे तुम्हाला कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. मासे बऱ्याच लोकांना खायला आवडतात. माशांच नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी येते.(This news is for you fish eaters)

आपण ऐकत आलो आहोत की, मासे खाणे हे आरोग्यासाठी फायद्याचे आहे. मात्र हेच मासे तुमच्या जीवावरही उठू शकतात. मासे खाल्ल्याने तुम्हाला कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. कारण मुंबईकरांना जास्त प्रमाणात मासे आवडतात. मुंबईच्या माशांमध्ये जास्त प्रमाणात प्लास्टिकचे मायक्रो अंश सापडले आहेत.

केंद्रीय शैक्षणिक मत्स्य संस्था अर्थात CIFEच्या संशोधनात ही बाब उघड झाली आहे. एल्सव्हायर नावाच्या नावाजलेल्या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. या संशोधनानुसार, मुंबईतले सांडपाणी थेट समुद्रात सोडले जाते. त्यात बरंच प्लास्टिक असते. याशिवाय किनाऱ्यावरही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असते. यातले बरचसे प्लास्टिक समुद्रतळाशी जाते. त्यामुळे समुद्रतळाशी राहणाऱ्या माशांमध्ये प्लास्टिकचे अंश आढळून आले आहेत.

विशेष करून मुंबईकरांच्या आवडीचा बोंबिल, घोळ आणि जिताडा माशातही प्लास्टिकचे सुक्ष्म कण सापडले आहेत. या सर्व माशांच्या कल्ल्यात काळ्या-निळ्या रंगाचे प्लास्टिकचे अंश सापडल्याचे संशोधनात म्हटले आहे. या संशोधनानुसार मुंबईतले सांडपाणी थेट समुद्रात सोडले जाते. त्यात बरचसे प्लास्टिक असते.

याशिवाय किनाऱ्यावरही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असते. यातले बरचसे प्लास्टिक समुद्रतळाशी राहते. त्यामुळे समुद्रतळाशी राहणाऱ्या माशांमध्ये प्लास्टिकचे अंश आढळून येतात. विशेषतः मुंबईकरांच्या आवडीच्या बोंबिल, घोळ आणि जिताडा माशातही प्लास्टिकचे सुक्ष्म कण सापडले आहेत.

या सर्व माशांच्या कल्ल्यात काळ्या निळ्या रंगाचे प्लास्टिकचे कण सापडल्याचेही संशोधन केले आहे. प्लास्टिकचे विघटन होत नाही सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे माशाच्या माध्यमातून हे प्लास्टिक माणसाच्या शरीरात जाते. त्यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्याची शक्याता असते. याशिवाय पोट दुखणे, अतिसार अशा समस्याही उद्भवू शकतात. यामुळे मासे खाताना सावध राहा हे चवदार मासे गंभीर आजारांना निमंत्रण देतात.

महत्वाच्या बातम्या
चांगल्या चांगल्या सरकारी नोकऱ्या सोडून करतीये भटक्या कुत्र्यांची सेवा, दर महिन्याला २० हजारांचा खर्च
माहिती कामाची! मार्चमध्ये ‘या’ भाज्यांच्या बिया लावा आणि मे मध्ये ताज्या भाज्या खा आणि निरोगी राहा

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now