Share

हार्दीक पांड्याची जागा घेण्यासाठी ‘हा’ मराठमोळा खेळाडू सज्ज; एकट्याच्या बळावर संघाला जिंकवतोय

Hardik Pandya (

Arjun Tendulkar: विजय हजारे ट्रॉफी सध्या भारतीय देशांतर्गत खेळली जात आहे. ज्यामध्ये भारताचा युवा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकर जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे. गोव्याच्या बाजूने स्पर्धेत खेळताना अर्जुनने अरुणाचल प्रदेशविरुद्ध प्राणघातक गोलंदाजी केली. ज्यामुळे त्याच्या संघाला दणदणीत विजय मिळाला.

आपल्या जबरदस्त बॉलिंगच्या जोरावर त्याने अरुणाचल प्रदेश संघाला केवळ १७५ धावांपर्यंतच मजल मारु दिली. भारतीय देशांतर्गत  खेळल्या जात असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये आज १९ नोव्हेंबर रोजी गोवा आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात सामना झाला.  ज्यामध्ये गोवा संघाने शानदार विजय मिळवला.

गोवा संघाच्या या विजयामागे सर्वात मोठा वाटा संघाचा गोलंदाज अर्जुन तेंडुलकरचा होता. र्जुन तेंडुलकरने या सामन्यात जीवघेणी गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आणले.

घातक गोलंदाजी करताना अर्जूनने फारच कमी धावा दिल्या आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांना अडचणीत आणले. या सामन्यात अर्जूनने ९षटके गोलंदाजी केली आणि फक्त ३.११ च्या सरासरीने धावा दिल्या.

दरम्यान, भारतीय देशांतर्गत खेळल्या जात असलेल्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यात नाणेफेक जिंकून अरुणाचल प्रदेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी अरुणाचल प्रदेश संघाने ५० षटके गोलंदाजी केली आणि फक्त १७५ च्या सरासरीने धावा दिल्या.

अरुणाचल प्रदेशच्या डावाची सुरुवात सलामीवीर नागुरंग जेम्स आणि अमरेश रोहित यांनी केली. याशिवाय फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत.  अरुणाचल प्रदेशने दिलेल्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गोवा संघाने अवघ्या २५.६ षटकांत हे लक्ष्य अगदी सहज गाठले आणि संघाला दणदणीत विजय मिळाला.

महत्वाच्या बातम्या-
Dhananjay Powar: लोकांना हसून हसून बेजार करणारा युट्यूब स्टार डिपी दादा म्हणजेच धनंजय पोवार फेमस कसा झाला?
Tamilnadu : तामिळनाडूच्या संघाने केला वनडेमध्ये विश्वविक्रम, तब्बल ५०० धावा ठोकत इंग्लंडला टाकले मागे 
Big Boss Marathi : किरण माने घराबाहेर पडताच विकास सावंतची पलटी? अपुर्वा नेमळेकरशी सलगी करत तोंडात भरवला घास

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now