यापूर्वी कधीही घडला नव्हता एवढा मोठा बंड एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये घडून आला. ठाकरे सरकार अल्पमतात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला आणि सरकार कोसळले. त्यानंतर आता पक्षाला सावरण्यासाठी आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेने महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यांच्या या सभांना प्रचंड गर्दी होताना दिसते. त्यांच्या सभेतील एक भावनिक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. (This loyal Shiv Sainik made everyone cry, watch the video)
गंगापूरच्या सभेतील हा व्हिडिओ आहे. आदित्य ठाकरे सभेच्या व्यासपीठावरून शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. त्यावेळी त्यांचे बोलणे ऐकून शिवसैनिक हळवा झाला आणि रडू लागला, या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
आदित्य ठाकरेंचे भरसभेत स्टेजवर भाषण चालू असताना सर्वसामान्य शिवसैनिकाचे हे रडणे पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. ‘हीच खरी निष्ठा’ या कॅप्शनने हा व्हायरल झाला. या व्हिडिओला सोशल मीडियातून प्रचंड लाईक आणि कमेंट्स मिळत आहेत.
याआधी पक्षावर निष्ठा सांगणारे आमदार संतोष बांगर रडले आणि शेवटी एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले. शिवसेनेचे मोठे नेते रामदास कदम यांनी देखील पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आणि माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांना रडू कोसळले.
या नेत्यांच्या डोळ्यातले पाणी महाराष्ट्राने पाहिले. परंतु शिवसेना पक्षाची अशी अवस्था पाहून, आपल्या पक्षातील युवा नेत्याचे बोलणे ऐकून ढसाढसा रडणाऱ्या या सर्वसामान्य शिवसैनिकाने सर्वांना रडवले. हा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर अनेक आमदार, खासदारांनी शिंदे गटाची वाट धरली. तेव्हा ठाकरे पिता-पुत्रांनी सामान्य शिवसैनिकांना भावनिक साधली आणि आपल्यासोबत राहण्याचे आवाहन केले. पक्षाला सावरण्यासाठी आता शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
‘उद्धव ठाकरे देशाचे नेतृत्व करतील या भीतीने भाजपने शिवसेनेत फूट पाडली’
शिवरायांच्या मुर्तीला आक्षेप घेत तिरूपती देवस्थानने अडवली गाडी; अखेर सत्य आले समोर
“पुरंदरेंनी लिहीलेला इतिहास अन्यायकारक वाटत असेल तर पवारांनी स्वतः शिवचरित्र लिहावे”