Share

महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यामुळे माझ्यात लढण्याची हिंमत आली; आदित्य ठाकरेंची भर सभेत कबुली

शिवसेनेचे अनेक आमदार खासदार हे शिंदे गटात प्रवेश करत आहेत. शिवसेनेला गळती लागली आहे. त्यामुळे शिवसेनेला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. त्यांच्या शिवसंपर्क अभियानाला प्रचंड शिवसैनिकांची साथ मिळत आहे.

याच शिवसंपर्क अभियाना अंतर्गत आदित्य ठाकरे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे हे काल अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाले होते. तेथे नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात त्यांचे शिवसेना नेते उदयन, गडाख, शिवसेनेचे अहमदनगर उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे आणि शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले.

औरंगाबाद येथील रोड शो ला आदित्य ठाकरे यांना शिवसैनिकांची जी साथ मिळाली तीच याठिकाणी पाहायला मिळाली. यावेळी पाऊस सुरू असूनही मोठ्या संख्येत शिवसैनिक जमले होते. आदित्य ठाकरेंनी यावेळी शंकरराव गडाख यांच्या सभेचे कौतूक केले, आणि त्यांच्यामुळे आपल्यात हिंमत आल्याचे सांगितले.

आदित्य ठाकरे म्हणाले, मी उदयन व शंकरराव गडाख यांची सभा पाहिली. त्यानंतर मला ताकद व हिंमत आली. आमच्याप्रती तुमचे प्रेम पाहिले. आपली तशी दोन-अडीच वर्षांचीच ओळख आहे. तुमच्या आजोबांनीही माझ्या वडिलांना फोन करून सांगितले की ‘घाबरू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, यालाच आशीर्वाद, प्रेम, महाराष्ट्र धर्म, हिंदुत्त्व म्हणतात.

म्हणाले, खुप वेळा आपले दुःख जास्त लोकांना सांगूही शकत नाही. सर्व शिवसैनिकांना धक्का बसला आहे. एवढे दिवस ज्या लोकांना आपण डोक्यावर नाचवलं, प्रेम दिले, त्यांच्या मतदानासाठी, प्रचारासाठी उतरलो होतो. हे लोक मोठे झाले मंत्री झाले. यांच्या सुखा-दुःखात आम्ही होतो. तरीही आमच्या पाठीत त्यांनी खंजीर का खुपसला हेच कळत नाही.

तसेच आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात सगळं चांगल चाललं आहे ते त्यांना रुचले नाही, आणि आपल्या गद्दारांना वाटले चला सूर मे सूर मिलाते है. ते गेले. ही गद्दारी होऊन महिना झाला. तरी कळत नाही आपण त्यांना काय कमी दिले, त्यांना असे काय मिळणार आहे, की यांचे जग बदलणार आहे. त्यांना मिळणाऱ्या आकड्यांची तुलना तुमच्या प्रेमाशी होणार नाही. हे प्रेम विकत मिळत नाही.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now