असं म्हणतात की संगतीचा प्रभाव प्रत्येकावर कधी ना कधी पडतच असतो. याचा अर्थ असा की जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत जास्त काळ राहिलात, तर त्याची काही ना काही सवय तुमच्यातही येते आणि तुम्हीही तेच करू लागता. माणुस असो वा प्राणी असो, संगतीचा प्रभाव सर्वांवर पडतो. तुम्ही या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता. ज्यामध्ये कुत्रा (dog) भुंकण्याऐवजी कोंबड्यासारखा बांग देताना दिसत आहे. (This is the result of companionship)
हा व्हिडीओ खूपच मजेशीर असून हे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केले जातात. जर प्राण्यांचे व्हिडिओ मजेदार असतील तर ते अधिक लोकांना आवडते. असाच एक व्हिडिओ सध्या युजर्सना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ एका गोंडस कुत्र्याचा आहे.
या व्हिडिओमध्ये एक कुत्रा भुंकायला विसरल्याचे तुम्ही पाहू शकता. सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओ पाहून खूप एन्जॉय करत आहेत. साधारणपणे पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्व प्राण्यांचे आवाज इतर प्राण्यांच्या आवाजापेक्षा वेगळे असतात. त्यांच्यामध्ये कुत्र्याचा आवाज सर्वात वेगळा आहे. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकून मोठमोठे प्राणी पळून जातात.
भुंकण्याच्या कलेमुळे कुत्राही मानवांमध्ये सर्वाधिक पसंत केला जातो. तसेच सर्वात इमानदार प्राणी म्हणून कुत्रा ओळखला जातो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कुत्र्याच्या तोंडातून कोंबडीसारखा आवाज येत असल्याचे पाहून सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही कुत्रा पाहू शकता. तो त्याच्या मालकासमोर सोफ्यावर बसलेला दिसतो.
दरम्यान, त्याला दुसऱ्या कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज येतो. या आवाजाने हा कुत्रा इतका घाबरतो की तो भुंकायच विसरतो. यानंतर कुत्र्याच्या तोंडातून आवाज येत नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचवेळी त्याच्या तोंडातून आवाज निघतो, तेव्हा संपूर्ण सोशल मीडियाला त्याचे आश्चर्य वाटते. व्हिडिओमध्ये तुम्ही कुत्रा कोंबडीप्रमाणे ओरडताना ऐकू शकता.
कुत्र्याचा आवाज ऐकून त्याचा मालकही हैराण झाला. मालक त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो. यासोबत त्याने कॅप्शन लिहिले की, ‘माझा कुत्रा भुंकायला विसरला आहे.’ हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना मालकाने लिहिले की, त्याचा आवाज ‘कोंबडीसारखा येत आहे’.
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी : भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द; सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका
श्वेता तिवारीचे वादग्रस्त वक्तव्य; अंडरगारमेंटला देवाशी जोडले, म्हणाली, ‘देव माझ्या ब्रा ची…’
फडणवीसांची शिष्टाई अपयशी! उत्पल पर्रिकरांचा पणजीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल
घरी कोणीही नसताना १० वर्षांच्या मुलाने घरातच घेतली फाशी, टीव्हीवर रोज पाहायचा क्राईम पेट्रोल