Share

योगी आदित्यनाथांचा जलवा; तब्बल ४५ वर्षांनंतर पहिल्यांदाच केला ‘हा’ विक्रम

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी गोरखपूर शहरी मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. यावेळी 53.30% लोकांनी मतदान केले. 45 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. मागील वेळेच्या म्हणजेच 2017 च्या तुलनेत यावेळी 2.32% ने वाढ झाली आहे. 2017 मध्ये येथील 50.98% लोकांनी मतदान केले होते.(This is the first record set by Yogi Adityanath after 45 years)

मुख्यमंत्री योगी यांच्या जागेवर मतदानाची टक्के वाढल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मतदान वाढवण्याचा राजकीय अर्थ लोक काढत आहेत. अशा परिस्थितीत गोरखपूरच्या या जागेवर 1977 पासून आतापर्यंत काय घडले हे आम्ही तुम्हाला आकडेवारीच्या माध्यमातून सांगणार आहोत. तसेच मतदानात वाढ आणि घट याचा फायदा कोणाला झाला? हे देखील जाणून घेणार आहोत.

वर्ष     उमेदवार                       पक्ष              मतदान
1977  अवधेश कुमार श्रीवास्तव       जनता पार्टी      43.9%
1980  सुनील शास्त्री                  काँग्रेस (I)       42.1%
1985  सुनील शास्त्री                  काँग्रेस            37.5%
1989   शिवप्रताप शुक्ल               भाजपा            49.5%
1991  शिवप्रताप शुक्ल               भाजपा            43.4%
1993  शिव प्रताप शुक्ल              भाजपा            47.7%
1996  शिव प्रताप शुक्ल              भाजपा            38.0%
2002  डॉ. राधामोहन दास अग्रवाल  हिंदू महासभा    33.1%
2007  डॉ. राधामोहन दास अग्रवाल  भाजपा           28.6%
2012  डॉ. राधामोहन दास अग्रवाल  भाजपा           46.2%
2017  डॉ. राधामोहन दास अग्रवाल  भाजपा           50.98%

गोरखपूर शहरी जागा 1989 पासून भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. 2002 मध्ये तिकीट वाटपावरून योगी आदित्यनाथ आणि पक्षाच्या नेत्यांमध्ये मतभेद झाले होते. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या डॉ. राधामोहन दास अग्रवाल यांच्या तिकिटावर या जागेवरून निवडणूक लढवली होती. अग्रवाल जिंकले होते. मात्र, 2007 पासून डॉ.राधामोहन यांनी भाजपच्या तिकिटावर सलग तीन निवडणुका जिंकल्या आहेत.

 

गेल्या 45 वर्षांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले, तर जेव्हा-जेव्हा मतदान वाढले, तेव्हा त्याचा फायदा भाजपला झाला. म्हणजे मतदान जास्त झाले तर भाजपच्या विजयाचे अंतरही वाढते.
2007 : सर्वात कमी 28.6% मते पडली, त्यानंतर भाजपचे डॉ. राधामोहन अग्रवाल 22,392 मतांनी विजयी झाले. अग्रवाल यांना 49,715 मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले समाजवादी पक्षाचे भानू प्रकाश मिश्रा यांना 27,323 मते मिळाली.

2012: मतदान 28.6% वरून 46.2% पर्यंत वाढले. त्यानंतर भाजपच्या विजयाचे अंतरही सुमारे चार टक्क्यांनी वाढले. त्यानंतर डॉ. राधामोहन अग्रवाल 47,454 मतांनी विजयी झाले. डॉ. अग्रवाल यांना 81,148 मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या समाजवादी पक्षाच्या राज कुमारी देवी यांना 33,694 मते मिळाली.

2017: निवडणुकीदरम्यान सुमारे चार टक्क्यांनी मतदान वाढले. त्यानंतर 50.98% लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर भाजपचे डॉ. राधामोहन अग्रवाल 60730 मतांनी विजयी झाले. डॉ. अग्रवाल यांना 122,221 मते मिळाली, तर काँग्रेसचे राणा राहुल सिंग दुसऱ्या क्रमांकावर होते. राहुल यांना 61491 मते मिळाली.

राजकीय विश्लेषक प्रा. अजय सिंह सांगतात की, मतदान वाढण्याचे दोन अर्थ आहेत. पहिल म्हणजे सरकार उमेदवाराविरुद्धची अँटीकंबन्सी आणि दुसर म्हणजे उमेदवार किंवा पक्षाची लाट. दुसरे कारण गोरखपूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी निवडणूक लढवणे हे अधिक असू शकते. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद श्रीवास्तवही म्हणतात, ‘गोरखपूरची ओळख आता योगी आदित्यनाथ यांच्याशी अधिक जोडली गेली आहे. अशा स्थितीत मतदानाचा टक्का वाढणे हे योगींसाठी चांगले लक्षण ठरू शकते.

महत्वाच्या बातम्या-
तुमचा आणि शिवरायांचा संबंध काय? नुसती भाडणं लावता; राज ठाकरेंनी कोश्यांरींना झाप झाप झापले
रसोडे में कौन था गाण्यानंतर छोरी पटाता है गाण्याने घातला धुमाकूळ, पहा ८२ लाख लोकांनी पाहिलेला व्हिडीओ
PHOTOS: या आहेत भोजपुरीच्या टॉप १० ग्लॅमरस अभिनेत्री; सनी लिओनी, नोरा फतेहीही पडतील फिक्या

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now