‘पुष्पा द राईस’ या अल्लू अर्जूनच्या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने मोठी कमाई केली. चित्रपटातील डायलॉगने प्रेक्षकांना वेड लावलं. त्यानंतर आता अल्लू अर्जूनचा आगामी ‘पुष्पा द रूल’ या चित्रपटाची प्रेक्षकांना आतुरता लागलेली आहे.
‘पुष्पा द रूल’ या चित्रपटाच्या शुटिंगलाही सुरूवात झालेली आहे. अलीकडेच अल्लू अर्जून वाढवलेल्या केसांत आणि मोठ्या दाडीत पुष्पा लूकमधे दिसून आला. या लूकमध्ये प्रेक्षकांना अल्लू अर्जूनच्या वाढलेल्या वजननाने सर्वांत अधिक आकर्षित केलं.
माहितीनुसार, अल्लू अर्जूनने त्याच्या पुष्पा द रूल या आगामी चित्रपटासाठी त्याचे वजन अती जास्त वाढवलेले आहे. मात्र त्याच्या वाढत्या वजनामुळे त्याला सोशल मीडियावर आता ट्रोल व्हावं लागत आहे. त्याच्या वाढत्या वजनातील फोटोवर नेटकऱ्यांनी त्याला शेमिंग कमेंट केले आहे.
एका नेटकऱ्याने तर ‘हा तर वडापावच दिसतोय’, असा कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने ‘हा तर दिवसेंदिवस म्हातारा होत चाललाय’, अशी कमेंट केली आहे. तिसऱ्याने ‘हा तर सडकछाप चोरासारखा दिसतोय’ असं म्हटलं आहे. तर अनेकांनी अल्लू अर्जूनचे वजन पाहून त्याच्या मेहनतीचे कौतूक केले आहे.
माहितीनुसार, ‘पुष्पा: द रूल’ मध्ये श्रीवल्लीचा मृत्यू होणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये फहाद फासिल या अभिनेत्याची महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. सोशल मीडियावर नेटकरी फहाद आणि रश्मिका यांच्या भूमिकांविषयी अनेक तर्क लावत आहेत.
या चित्रपटातील खलनायकाचे पात्र साकारणारा अभिनेता फहाद फासिल हाच राश्मिकाची म्हणजे श्रीवल्लीची हत्या करतो, असे तर्क नेटकरी लावत आहेत. श्रीवल्लीच्या मृत्यूचा पुष्पराज बदला घेतो, असे बोलले जात आहे. हा चित्रपट सर्व सीमा पार करेल आणि आंतरराष्ट्रीय हिट ठरेल, असे निर्मात्यांचे म्हणणे आहे.