Share

याला म्हणतात जिद्द! आई मजूरी करते, स्वत: पेपर टाकायचा, दहावीत मिळवले ८२ टक्के, होतंय कौतुक

मनात जर इच्छा असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते, असे आपण बऱ्याचदा एखाद्या सूचना फलकावर किंवा एखाद्या विचारवंतांकडुन ऐकले असेल. परंतु याचे जिवंत उदाहरण नांदेड  येथे पाहायला मिळाले आहे. कठीण परिस्थितीवर मात करत शुभम कोडगिरवारने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.

घरात अठरा विश्व दारिद्रय, त्यात वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले. त्यामुळे शुभमच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट आले होते. अशा परिस्थितीत त्याने स्वतः च्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी घेतली. शुभम यंदा दहावीच्या वर्गात शिकत होता. नुकताच या परीक्षेचा निकाल लागला आहे. त्त्यात शुभमला 82 टक्के गुण मिळाले आहे.

कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शुभमची आई एका ग्रंथालयात काम करते. तर शुभमचा मोठा भाऊ हा पेपर टाकायचा.त्याला दहावीत ७८ टक्के गुण मिळाले होते. आई आणि भावाला हातभार लावण्यासाठी शुभमने पेपर विकण्याचा निर्णय घेतला. तो दररोज सकाळी लवकर उठून  सगळ्यांच्या घरोघरी जाऊन तो पेपर विकायचा.

पेपर विकून तो उरलेल्या वेळेत अभ्यास करायचा. यावर्षी तो दहावीत होता. या परीक्षेत तो चांगल्या गुणांनी पास झाला आहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. कठीण परिस्थितीवर मात करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीच्या हाताची गरज असते. मदत मिळाल्यास त्यांच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळू शकते.

आज समाजात शुभमसारखी कष्ट करणारी मुले खूप कमी आहेत. त्याच्या या यशाचे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि वृतपत्र विक्रेत्यांमधुन कौतुक केले जात आहे. या यशामुळे शुभममध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला असून येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीवर मात करण्याचा त्याने निश्चय केला आहे.

कोरोनाचे सावट कमी झाल्याने यावर्षी दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली होती. अनेक दिवसांपासून दहावीचे विद्यार्थी निकालाची वाट पाहत होते. नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

ताज्या बातम्या शिक्षण

Join WhatsApp

Join Now