Share

११०५ कोटींना विकली गेली ‘ही’ खास मर्सिडीज कार, मालकालाही नाही चालवायची परवानगी

जगातील लक्झरी कार कंपन्यांपैकी एक असलेल्या मर्सिडीजची कार खूप महाग आहे. नुकत्याच झालेल्या लिलावानंतर मर्सिडीजची ३००SLR ही जगातील सर्वात महागडी कार ठरली आहे.  १९५५ मध्ये बनवलेली मर्सिडीज-बेंझ ३००slr कार ११०५ कोटी रुपयांना विकली गेली आहे. या मर्सिडीज-बेंझ कारने १९६२ च्या फरारी जीटीओलाही मागे टाकले आहे. फरारी GTO ची २०१८ मध्ये सुमारे ३७५ कोटींना विक्री झाली. (Mercedes, Mercedes-Benz 300slr, luxury car)

जगभरात विंटेज कारचा जलवा पाहायला मिळत असून, प्रसिद्ध कंपनीचे हे मॉडेल खरेदी करण्यासाठी ग्राहक कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहेत. कॅनडाच्या सोथबी ऑक्शन हाऊसने लिलावात जगातील सर्वात महागडी कार विकल्याची घोषणा केली आहे. जी मर्सिडीज-बेंझ रेस कार १४३ दशलक्षमध्ये विकली गेली ती SLR ३०० आहे.

या मर्सिडीज-बेंझ कारचे फक्त दोन प्रोटोटाइप तयार केले गेले. मर्सिडीज-बेंझने SLR ३०० ही रेसिंग कार म्हणून विकसित केली. १९५५ चा ३०० SLR गेल्या ५ मे रोजी जर्मनीतील लिलावात विकला गेली. या लिलावात सर्व नियम व अटींचे पालन करता येईल, याची काळजी या लिलावात घेण्यात आली.

हा लिलाव एक खास लिलाव होता ज्यामध्ये प्रत्येकाला भाग घेण्याची परवानगी नव्हती. मर्सिडीजच्या निवडक ग्राहकांनाच या लिलावात सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती. Sotheby’s मधील या लिलावासाठी खास अशा लोकांना आमंत्रित करण्यात आले होते जे त्यांच्या आर्टचे संकलन आणि खरेदीसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत.

गंमत म्हणजे एवढी मोठी रक्कम खर्च केल्यानंतर ती कार विकत घेणार्‍या व्यक्तीला ती रोज रस्त्यावर चालवता येणार नाही. खरं तर, मर्सिडीज-बेंझ ३०० एसएलआर त्याच्या मालकाच्या घरी जाणार नाही किंवा दररोज रस्त्यावर प्रवास करू शकणार नाही. मर्सिडीज-बेंझच्या नवीन मालकाला ही कार फार कमी वेळा चालवायला मिळेल.

करारानुसार, मर्सिडीज-बेंझ ३०० एसएलआर जर्मनीतील संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. मर्सिडीज-बेंझ ३०० एसएलआर ही १९३० च्या दशकातील रेसिंगसाठी प्रसिद्ध कार होती. सर्व कारची मोनालिसा म्हणून ती ओळखली जाते.

महत्वाच्या बातम्या-
काय सांगता? भिकाऱ्याने भीक मागण्यासाठी घेतली नवी गाडी, दिवसाची कमाई वाचून अवाक व्हाल
LPG सबसिडी: सरकारने गॅसवर जाहीर केली २०० रुपये सबसिडी, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ
राज्यात लवकरच भाजप सरकार येईल आणि पुढील ५० वर्षे.., नारायण राणेंचा खळबळजनक दावा
घोषणा मोठी पण दिलासा नाही! राज्य सरकारकडून पेट्रोल डिझेलवर कर कमी मात्र दर जैसे थे च?

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now