Share

घटस्फोटानंतर सामंथाने परत केली नागा चैतन्यने दिलेली ‘ही’ खास भेट, लग्नाशी आहे खास संबंध

साऊथची सुपरहिट अभिनेत्री समंथा रुथ प्रभू व्यावसायिक आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. अलीकडेच ती अभिनेता नागा चैतन्य अक्किनेनीसोबत घटस्फोट घेतल्याने खूप चर्चेत होती. मात्र, हे जोडपे वेगळे झाल्यावर चाहत्यांची निराशा झाली.(this-is-a-special-gift-from-naga-chaitanya-a-special-relationship-with-marriage)

पतीपासून विभक्त झाल्यानंतर समंथा पुन्हा एकदा तिचं आयुष्य रुळावर आणण्यात व्यस्त आहे. त्याचवेळी ‘पुष्पा'(Pushpa) अभिनेत्री समंथाबाबत एक नवीन बातमी समोर येत आहे. बातमीनुसार, समंथाने नागा चैतन्यने दिलेली खास भेट परत दिली आहे. घटस्फोटानंतर समंथा रुथ प्रभूने आता नागा चैतन्यने दिलेली खास भेट परत केली आहे जी त्यांच्या लग्नाशी संबंधित होती.

वृत्तानुसार, समंथाने तिला लग्नात दिलेली साडी परत केली आहे. ही साडी नागा चैतन्यच्या आजीची होती. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, तिची जवळची मैत्रीण आणि डिझायनर क्रेशा बजाजने समंथाच्या लग्नापूर्वी या साडीला फायनल टच दिला होता. तिची ही साडी खूप सुंदर आहे.

समंथा रुथ प्रभूने 2 ऑक्टोबर रोजी नागा चैतन्य(Naga Chaitanya) अक्किनेनीपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. समंथा रुथ प्रभू आणि नाग चैतन्य यांनी एकमेकांना दीर्घकाळ डेट केले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. समंथा रुथ प्रभू आणि नाग चैतन्य यांनी 2017 मध्ये एकमेकांशी लग्न केले.

दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन परंपरेनुसार लग्न केले. त्यावेळी समंथा रुथ प्रभू आणि नाग चैतन्य यांच्या शाही लग्नाचीही खूप चर्चा झाली होती. पण त्यांचे वैवाहिक आयुष्य संपल्याच्या बातमीने चाहत्यांना खूप आश्चर्यचकित केले.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now