खेळाडूंच्या आयुष्याशी संबंधित सर्व गोष्टी जाणून घेण्यात चाहत्यांनाही उत्सुकता असते. विशेषतः क्रिकेटपटूंची लव्हस्टोरी. आता यांनाच घ्या, लग्नाला बरीच वर्षे झाली, पण त्यांची स्टोरी कधीच जुनी होत नाही. आम्ही बोलत आहोत क्विंटन डी कॉकच्या लव्हस्टोरीबद्दल. आज आम्ही तुम्हाला साऊथ आफ्रिकेचा विकेटकिपर आणि फलंदाज क्विंटन डी कॉकची लव्हस्टोरी सांगणार आहोत.(this-fearless-cricketer-married-a-cheerleader-the-love-story-started-on-the-ipl-ground)
क्विंटन डी कॉक साशा हार्ले नावाच्या चीअर लीडरच्या(Cheer leader) प्रेमात पडला होता. 2015 मध्ये त्यांनी इंगेजमेंट केली आणि 2016 मध्ये लग्न केले. क्विंटन डी कॉकची पत्नी साशा हार्ले चीअरलीडर म्हणून काम करायची. साशाने आयपीएलमध्येही काम केले आहे. डी कॉकची साशासोबत पहिली भेट एका आयपीएल सामन्यादरम्यान झाली होती.
डी कॉकने(De Kock) साशाला पहिल्यांदा 2012 मध्ये गुजरात लायन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यादरम्यान पाहिले होते. दोघांचे सोशल मीडियावरून बोलणे सुरू झाले, त्यानंतर दोघे चांगले मित्र बनले. दोघांनी या मैत्रीला प्रेम असे नाव दिले आणि 2016 मध्ये लग्न केले.
क्विंटन डी कॉकची पत्नी साशा हार्ले(Sasha Harley) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि साशाला कुत्रे पाळणे आणि ट्रॅवलिंग करणे आवडते. साशा हार्ले अनेकदा क्रिकेटच्या ग्राउंडवर डी कॉकला चिअर करताना दिसत आहे.