भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर(Arjun Tendulkar) सध्या लंडनमध्ये आहे. इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वेटसोबत अर्जुन तेंडुलकर लंडन शहरात फिरताना दिसत आहेत. सोशल मीडियावर त्या दोघांचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. डॅनियल वेट आणि अर्जुन तेंडुलकर फार पूर्वीपासून मित्र असल्याचे सांगितले जात आहे.(this england cricketer and arjun tendulkar travel in london)
इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वेटने २०१४ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला प्रपोज केले होते. डॅनियल वेटने यासंदर्भात एक ट्विट केले होते. त्यावेळी डॅनियल वेट खूप चर्चेत आली होती. आता डॅनियल वेट आणि अर्जुन तेंडुलकर लंडनमधील काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये डॅनियल वेट आणि अर्जुन तेंडुलकर लंडनमधील एका रेस्टोरंटमध्ये जेवण करताना दिसत आहेत.
अर्जुन तेंडुलकर रेस्टोरंटमध्ये जेवण करतानाचा फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वेट ही अर्जुन तेंडुलकरची खूप मोठी चाहती आहे. तिने अनेकदा अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीची कौतुक केले आहे.
सचिन तेंडुलकर कुटूंबासह प्रत्येकवर्षी इंग्लंडला जातो. त्यावेळी अर्जुन तेंडुलकर लॉर्ड्सवर गोलंदाजीच्या सरावासाठी जात असतो. त्यावेळी नेट्समध्ये अर्जुन तेंडुलकर इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वेटच्या विरोधात गोलंदाजी करतो. एका मुलाखतीत इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वेटने अर्जुन तेंडुलकरबद्दल सांगितले होते.
“अर्जुन तेंडुलकर हा एक उत्तम गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीचा वेग देखील उत्तम आहे. तो नेटसमध्ये माझ्या विरोधात गोलंदाजी करतो. त्याच्या गोलंदाजीचा सामना करणे अतिशय कठीण आहे”, असे डॅनियल वेटने सांगितले होते. अर्जुन तेंडुलकरने एकदा नेट्समध्ये गोलंदाजी करत असताना जॉनी बेअरस्टोला जखमी केले होते.
यावेळी जॉनी बेअरस्टोच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. अर्जुन सध्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. अद्याप अर्जुनला पदार्पणाची संधी मिळालेली नाही. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी अतिशय खराब झालेली आहे. मुंबई इंडियन्स संघाला आयपीएलच्या यंदाच्या हंगामात क्वालिफायरमध्ये देखील प्रवेश करता आला नाही.
महत्वाच्या बातम्या :-
होय संभाजीनगरच! औरंगाबादच्या नामांतराचा मुहूर्त ठरला; मुख्यमंत्री ठाकरेंचा धडाकेबाज निर्णय
बॉलिवूड अभिनेत्यांपेक्षा जास्त कमाई करतात ‘हे’ निर्माते, महिन्याला कमावतात तब्बल ‘एवढे’ कोटी
टीम इंडियातील ‘या’ 5 फ्लॉप क्रिकेटर्सच्या बायका आहेत खुपच सुंदर, बॉलिवूड अभिनेत्र्याही पडतील फिक्या